ओला-सुका कचरा वेगळा करा, अन्यथा जबर दंड?(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,03-06-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरातील अनेक नागरिक अजूनही घंटागाडीत ओला व सुका कचरा एकत्र पद्धतीने देतात. त्यामुळे प्रक्रिया करताना प्रचंड त्रास होतो. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. १ जुलैपासून वर्गीकरण न करणाऱ्या आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना जबर दंड करण्याची घोषणा शुक्रवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी केली.
महापालिकेच्या घंटागाडीवर ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे गाणे लावले जाते; पण अनेकांना ते आवडत नाही. गाण्याचा आवाज कमी करावा अथवा गाणे बंद करण्याची सूचना मी दिल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. सफाईच्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. शहराला देशात नंबर वन करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. नागरिकांनीही थोडासा बदल स्वीकारला पाहिजे. नागरिकांनी घंटागाडीच्या आवाजावर विसंबून न राहता ॲपद्वारे आपल्या भागातील घंटागाडी कुठे आहे, आपल्या घरापर्यंत ती केव्हा येईल, याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. त्यासोबतच नागरिकांनी ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून दिले पाहिजे. वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांवर जून महिन्यात कारवाई केली जाणार नाही. मात्र १ जुलैपासून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
शहरात ७०० सीसीटीव्ही
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरात सुमारे ७०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचा शोध घेणे अधिक सोपे आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दंड किती असेल, हे लवकरच जाहीर केले जाईल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
५० लाखांपर्यंतची बक्षिसे
शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. ज्या भागात आस्थापना, गृहनिर्माण संस्था व इतर घटक चांगले काम करतील, त्यांना बक्षिसे दिले जातील. बक्षिसांची रक्कम ५० लाखांपर्यंत असेल, असे जी. श्रीकांत म्हणाले. कचरा व्यवस्थापनात काम करणारी उत्कृष्ट हॉटेल, रेस्टॉरंट, सलून, दुकाने, गृहनिर्माण संस्थांची निवड करून त्यांना पुरस्कार दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.
अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा
ब्रिटानिया कंपनीच्या वतीने वडगाव शिंदोडी शाळेत आरोग्यविषयक उपक्रम
सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.
चार अपत्य असल्याने गुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्र , जिल्हाधिकारी यांचा आदेश
मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.
व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
जगण्याची व्यथा म्हणजे कथा - प्रसिद्ध कथाकार सुरेंद्र गुजराथी
रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.
लेखक हा संघर्ष व संवेदनशीलतेतून निर्माण होतो,मात्र लिहिण्याची प्रेरणा वाचनातूनच मिळते.- डॉ. बाळासाहेब बळे
ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहे. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील जेष्ठ पत्रकार दशरथ यादव
आवाटी येथील ज्येष्ठ नागरिक आदम शेख यांचे निधन
के. पी. जाधव कॉलेजमध्ये १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण पुरस्कार उत्साहात संपन्न
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह सा. का. ची पहिली उचल २८०० रुपये.
स्वभिमानी मराठा महासंघाच्या पहिल्या अधिवेशनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात, राज्य निरीक्षक भानुदास वाबळे स्वभिमानी मराठा महासंघ भारत
विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे --निरीक्षक सचिनराव लगड
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर कार्यशाळा संपन्न.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.