लासूरला शिवसेनेचे आदेश रणयेवले यांचा बि.आर.एस.पक्षात प्रवेश(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,20-06-2023
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील शिवसेनेचे आदेश रणयेवले यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते इं. संतोष पाटील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. यावेळी लासूर स्टेशन येथील बीआरएसचे विकास पाटील चव्हाण, कुणाल पाटील वाघ यांची उपस्थिती होती.दरम्यान तेलंगनाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाचा व बी.आर.एस पक्षाचा विचार, ध्येय महाराष्ट्रातील गावागावात पोहचण्यासाठी प्रयत्न करावे व तळागाळातील जनतेपर्यंत बी.आर.एस पक्षाचे ध्येय धोरणे पोहचण्यासाठी प्रयत्न करावे असेही इं.संतोष पाटील माने यांनी पक्षप्रवेशावेळी आवाहन केले.
वाचक क्रमांक :