यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बोरीभडक टायर फाटा येथे टाटा आयशर टेम्पो उलटून अपघात,१४ प्रवासी जखमी होऊन थोडक्यात बचावले,
By : Polticalface Team ,26-06-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,२५ जून २०२३ रोजी पुणे सोलापूर महामार्गावर यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बोरीभडक चंदनवाडी टायर फाटा जवळ ता, दौंड जिल्हा पुणे, गावच्या हद्दीत दि,२५/०६/२०२३, रोजी, दुपारी ३: वाजे सुमारास घडला आहे, या संदर्भात फिर्यादी रोहित बबनराव गायकवाड वय ३८ वर्ष रा वाघोली यांनी यवत पोलीस स्टेशन येथे आरोपी टाटा कंपनीचा ११०९ टु मॉडेलचा टेम्पो नं एम एच १६ ए वाय ०९२९ वरील अज्ञात चालका विरुद्ध गु र नं ६६२/२०२३,भा द वि, कलम, २७९, ३३७,३३८, मो, व्हे, अँक्ट,१८४,१३४, १७७,अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक तजवीज ठेवण्यात आली आहे, हा अपघात होऊन पलटी झालेला आयशर टेम्पो हा भिगवन बाजू कडून पुणे बाजुला जात असताना टेम्पो चालकाने याने भरधाव वेगात रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून डिव्हायडर तोडून, स्विफ्ट कार नं एम एच १२, क्यू टी,५८४३, तसेच स्विफ्ट कार नं,एम एच १४ जी एच ३७८५, तसेच बजाज डिस्कवर मोटर सायकल नं एम एच ४२ जी ५०६, या गाडीस धडक देऊन तीन्ही वाहनांचे नुकसान केले असुन त्यामधील प्रवाशी किरकोळ जखमी होण्यास कारणीभूत ठरला असून अज्ञात टेम्पो चालकाने अपघाताची खबर न घेता पळुन गेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे, या अपघातातील एकूण १४ प्रवाशांना किरकोळ दुखापत होऊन थोडक्यात बचावले आहेत, स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, अपघातातील वाहनांमुळे हायवे रोड वरील वाहतूक ठप्प झाली होती,
पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी यवत पोलीस प्रशासनाच्या मदतीने, सर्व वाहने बाजूला करून तात्काळ वाहतूक सुरळीत करण्यात आली, या घटनेची खबर मिळताच यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली, खाजगी रुग्णालयात जाऊन अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करून, सदर घटनेची चौकशी करत जखमींना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, तसेच संबंधित टेम्पो व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी अपघातातील जखमी झालेल्या १४ प्रवाशांना सांगत वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले, या भिषण अपघातात कोणाची ही जीवित हानी झाली नसल्याचे बोलले जात आहे, (काळ आला होता मात्र वेळ नाही) अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त केली जात होती, या दुर्दैवी भीषण अपघातात कदाचित कित्येक जीव मृत्युमुखी पडले असते, हे सागणे कठीण झाले असते, पुढील तपास यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोहवा नागरे, पुढील तपास पोहवा गोसावी यवत पोलीस स्टेशन
करीत आहेत,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष