दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक जिल्हा अध्यक्ष राजकुमार यांच्या उपस्थितीत संपन्न
By : Polticalface Team ,01-07-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ३० जून २०२३, दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीची येणाऱ्या पंचवार्षिक निवडणूका काही दिवसात जाहीर होणार असल्याचे बिगुल वाजू लागले आहेत, दौंड तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मा राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत, दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन भाऊ वाघमारे तसेच शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरातील गणेश हॉल येथे शुक्रवार दि ३० जून रोजी आयोजित करण्यात आली होती, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक संपन्न झाली, दौंड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अजिंक्य गायकवाड व अक्षय शिखरे यांनी जिल्हा अध्यक्ष मा राजकुमार याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, जिल्हा उपाध्यक्ष सतीश साळवे यांचा सत्कार दौंड शहर अध्यक्ष सैफभाई मनियार व राहुल नायडू यांच्या हस्ते करण्यात आला, मंगलदास निकाळजे यांचा सत्कार टोनी आदर्श व संतोष कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला, या वेळी जिल्हाध्यक्ष मा राजकुमार यांनी शहर व दौंड तालुक्याचा आढावा घेऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, या आढावा बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली, दौंड तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये शहर व ग्रामीण भागात पक्ष बांधणी संदर्भात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचा ठराव करण्यात आला, तसेच महाराष्ट्र राज्यात व देशात विविध ठिकाणी होत असलेल्या दलित हत्याकांड प्रकरणी, पक्षाच्या वतीने लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला असून सध्या मुस्लिम समाज बांधवांनवर जो अंन्याय अत्याचार वाढत चालले आहेत, त्यामुळे देश व राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे, या पार्श्वभूमीवर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाईल अशी भुमिका पक्षाच्या वतीने घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
२० जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई या ठिकाणी गायरान जमिनी संदर्भात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, या मोर्चा संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले, तसेच येणाऱ्या विधानसभा लोकसभा व नगरपालिका निवडणुकीसाठी रणनिती आखली जाणार असून निवडणूक बुत कमिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली, या बैठकीदरम्यान तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश साळवे, तसेच जिल्हा सचिव मंगलदास निकाळजे यांनी उपस्थित कार्यकारी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले, या आढावा बैठकीचे नियोजन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी केले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष