दौंड तालुक्यातील लिंगाळी गावचे माजी पोलीस पाटील विजय बगाडे आणि मसनेरवाडी गावचे विद्यमान पोलीस पाटील, अश्विनी बगाडे यांचा उपक्रम,विद्यार्थीना शालेय साहित्य व वृक्षवंल्ली रोपांचे वाटप
By : Polticalface Team ,15-07-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १४ जुलै २०२३, रोजी दौंड तालुक्यातील मौजे लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील, मसनेरवाडी येडेवाडी, जगदाळे वस्ती, शाहूनगर या परीसरातील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वृक्ष वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला असल्याने, लिंगाळी पंचक्रोशीतील नागरिकांचे व पालकांचे लक्ष वेधले होते, हा आगळा वेगळा उपक्रम गेली पाच वर्षापासून सलग सुरू ठेवणारे लिंगाळी गावचे माजी पोलीस पाटील, विजय विलास बगाडे, व मौजे मसनेरवाडी गावचे विद्यमान पोलीस पाटील, सौ अश्विनी विजय बगाडे, या ( बगाडे पाटील) परीवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे,
दौंड तालुक्यातील मौजे लिंगाळी ता, दौंड जिल्हा पुणे ग्रामपंचायत हद्दीतील, मसनेरवाडी, येडेवाडी, जगदाळे वस्ती, शाहु नगर, या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकुण ११५ विद्यार्थी मुला मुलींना प्रत्येकी दोन वह्या पेन खुडलंब्बर, सीसी पेन्सिल शोपनेर, पंट्टी, इत्यादी शालेय साहित्य आणि वृक्ष वल्ली रोपांचे मान्यवरांच्या हस्ते वाटत करण्यात आले, हा आगळा वेगळा उपक्रम दि,१४ जुलै २०२३ रोजी लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील शाहु नगर ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा,महेश आण्णा भागवत, लिंगाळी ग्रामपंचायतचे सरपंच मा.सुनिल जगदाळे पाटील, मसनेरवाडी गावचे विद्यमान पोलीस पाटील सौ अश्विनी बगाडे, या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले,
दौंड तालुक्यातील मौजे लिंगाळी गावचे माजी पोलीस पाटील, विजय बगाडे आणि मसनेरवाडी गावचे विद्यमान पोलीस पाटील अश्विनी बगाडे, या कुटुंबाने क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा उपक्रम गेली पाच वर्षा पासून सुरू केला आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, म्हणून, बगाडे पाटील कुटुंबाने दर वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुला मुलींना वाटपाचा उपक्रम सुरू केला असल्याचे निदर्शनास आले आहे,
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल, तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रेरणादायी सुविचाराचा आदर्श घेऊन, लिंगाळी गावचे माजी पोलीस पाटील विजय बगाडे, व त्यांच्या पत्नी मसनेरवाडी गावचे विद्यमान पोलीस पाटील, अश्विनी विजय बगाडे, यांनी परिसरातील बहुजन समाजातील मुला मुलींच्या शैक्षणिक कार्यात खारीचा वाटा उचलून सहकार्य करण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले, या वेळी दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधाकर लोंढे, लिंगाळी ग्रामपंचायतचे उपसरपंच सौ वैजंता ताई सुधाकर चितारे, लिंगाळी गावचे विद्यमान पोलीस पाटील,सौ निताताई वाघमारे, लिंगाळी गावाचे तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण मिसाळ, लिंगाळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अमिर शेख, ग्रामपंचायत सदस्य नितीन चितारे,
दौंड पोलीस स्टेशन लिंगाळी गावाचे बिट अंमलदार, किरण ढूके सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब येडे, निलेश जगताप, सचिन सोनवणे, विकी शेलार, सुशांत शेंडगे, लिंगाळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक शिक्षिकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण काळे सर यांनी केले, लिंगाळी गावचे माजी पोलीस पाटील विजय बगाडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष