वनविभागाच्या जमीन निर्वणीकरणाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांचे आश्वासन, आमदार राहुल कुल यांची माहिती

By : Polticalface Team ,22-07-2023

वनविभागाच्या जमीन निर्वणीकरणाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांचे आश्वासन, आमदार राहुल कुल यांची माहिती दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २२ जुलै २०२३ राज्यातील वनविभागाच्या जमीनी निर्वणीकरणाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावे यासाठी दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता या अनुषंगाने, वनविभागाच्या जमिनीच्या निर्वणीकरणासाठीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार व जमिनी वनेतर वापरासाठी देण्यासंदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. पावसाळी अधिवेशन २०२३ मध्ये सन १९८० पूर्वीच्या विविध सिंचन प्रकल्पांचे प्रकल्पग्रस्त, ग्रोमोअर योजना, भूमिहीन तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपजिविकेसाठी शासनाद्वारे वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे निर्वनीकरण करावे याबाबत स्वतंत्र एजन्सीची नेमणुक करावी यासाठी आमदार कुल यांनी विधानसभा सभागृहात अर्धातास चर्चेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते त्यावेळी ते बोलत होते.
पुनर्वसन तसेच शासनाच्या विविध योजना, भूमिहीन व अल्प भूधारक शेतकरी आदींसाठी शासकीय जमिनींचे वाटप करण्यात आले होते. १९२७ च्या वन अधिनियमाच्या नुसार जिल्हाधिकारी यांना निर्वणीकरण करण्याचे अधिकार होते परंतु वन संवर्धन कायदा १९८० लागू झाल्यानंतर पूर्वी वाटप करण्यात आलेल्या जमिनीच्या कायदेशीरते बाबत पेच निर्माण झाला आहे. २ डिसेंबर २०१६ रोजी शासन निर्णय महसूल व वन विभागाच्या मार्फत काढण्यात आला, या शासन निर्णयानुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
सदर प्रस्ताव सादर करणे शेतकरी व नागरिकांसाठी अवघड गोष्ट असल्याने त्यासाठी महसूल व वन विभागाने स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करावी, शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवर लागलेला राखीव वने हा शेरा काढण्यासाठी सर्व समावेशक धोरण ठरवावे, १३ वेगवेगळ्या सुविधा करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना व सार्वजनिक स्वरूपाच्या योजनांच्या पाईप लाईनसाठी वन विभागाने परवानगी जिल्हा स्तरावरून देण्याची व्यवस्था करावी अशा मागण्या यावेळी आमदार राहुल कुल यांनी केल्या आहेत.
राज्यातील झुडपी वने व राखीव वनक्षेत्राच्याबाबत केंद्र सरकारच्या व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार योग्य ती कार्यवाही केली जात आहे. या क्षेत्रावर शेतीसाठी कोणत्याही प्रकारची बंधने नाही. या क्षेत्रात कृषी उत्पादने संबंधित शेतकरी घेऊ शकतात. निर्वनीकरण करण्याच्या संदर्भात महसूल विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाले तर वनविभागामार्फत संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून या संदर्भात केंद्र सरकार पाठवून पाठपुरावा केला जाईल तसेच पाईप लाईनबाबत परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अधिकार देण्यात येतील असे आश्वासन यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष