पुणे जिल्हा अनुसूचित वस्तीगृह संस्था असोसिएशन च्या कार्यकारणीची नियुक्ती, अध्यक्ष पदी मा,गुरुमुख नारंग यांची बिनविरोध निवड

By : Polticalface Team ,25-07-2023

पुणे जिल्हा अनुसूचित वस्तीगृह संस्था असोसिएशन च्या कार्यकारणीची नियुक्ती, अध्यक्ष पदी मा,गुरुमुख नारंग यांची बिनविरोध निवड दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २४ जुलै २०२३ पुणे जिल्हा अनुसूचित वस्तीग्रह संस्था असोसिएशन च्या जिल्हा कार्यकारीणींची फेर रचना करण्यात आली, दौंड येथील नवयुग शिक्षण संस्थेचे चालक मा,गुरुमुख मटलामल नारंग यांची पुणे जिल्हा (अध्यक्ष पदी ) बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच विशाल जी तांबे (कार्याध्यक्ष) देवराम जी मुंडे, व विशाल जी शेवाळे (उपाध्यक्ष) अशोक लाल शहा,(सचिव) शिवाजीराव चाळक (खजिनदार) राहुल जी मखरे, (कायदा सल्लागार) श्रीकांत जी मोरे सर, सदस्य नितीन जी पाटील, सदस्य बशीर भाई तांबोळी, सदस्य संदिपान जी कडवळे, सदस्य पुणे जिल्ह्यातील सर्व अनुसूचित वस्तीग्रह संस्था चालक हे संघटनेचे पदसिद्ध सदस्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे, पुणे जिल्हा नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारणी यांचा विकास जी कदम, यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, या वेळी दलित पॅंथरचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष घनश्याम भोसले बौद्ध युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष रवी बनसोडे तसेच सर्व ३४ संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते, पुणे जिल्हा अनुसूचित वस्तीग्रह संस्था चालक असोसिएशन च्या कार्यकारिणी मध्ये हर्षवर्धन जी पाटील, बाळासाहेब दांगट, सतीश जी खोमणे (मामा), अनिल जी तांबे, प्रकाश जी बोरा, श्रीमती उषाताई वाघ, या मान्यवरांचा अनुसूचित वस्तीग्रह असोसिएशन च्या कार्यकारिणी मध्ये समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, पुणे जिल्हा अनुसूचित वस्तीग्रह संस्था असोसिएशन ची बैठक श्री शरदचंद्र जी पवार बहुउद्देशीय सभागृह धनकवडी येथे दि २३ जुलै २०२३ रोजी पार पडली, या वेळी पुणे जिल्ह्यातील अनुसूचित वस्तीग्रहाचे ३७ संस्था चालक प्रामुख्याने उपस्थित होते, राज्य शासनाच्या अडमुट धोरणामुळे महाराष्ट्र शासनाला धारेवर धरत विविध धोरणावर नाराजी व्यक्त करत सर्वांनमते या बैठकीत ठराव करण्यात आले, पुणे जिल्ह्यातील सर्व अनुसूचित व अनुदानित वस्तीग्रह संस्थांनवर बिकट परिस्थिती निर्माण झाली असून अडचणीत असल्याने खंत व्यक्त करण्यात आली, इमारत क्षेत्रफळा बाबतच्या शासन निर्णयामुळे अनुसूचित व अनुदानित वस्तीग्रहांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, शासनाने घेतलेल्या निर्णयात तत्काळ बदल करण्यात यावा, अन्यथा काही दिवसात अनुदानित वस्तीग्रह संस्था बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत, अशी उपस्थित संस्था चालकांनी प्रतिक्रीया व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयात तत्काळ बदल घडवून सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी प्रतिक्रिया संस्था चालकांनी व्यक्त केली आहे, परिपोषण अनुदान कर्मचारी मानधन आणि इमारत भाडे अनुदान मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत, त्या अनुषंगाने आवश्यक प्रमाणात निधी शासनाकडून येत नाही, जो तुटपुंज निधी शासनाकडून येतो त्यामध्ये प्राधान्याने कर्मचारी मानधन अदा करावे अशी सूचना शासनाकडून देण्यात येत असल्याने परिपोषण अनुदान व इमारत भाडे थकीतच राहत आहे, या बाबत जिल्हा परिषदेने शासनाकडे आवश्यक निधीची मागणी केली आहे, मात्र शासन या संदर्भात जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, अनुसूचित वस्तीग्रह संस्थांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आले, संध्या परीपोषण मानधन व इमारत भाडे या करिता एकच हेड आहे, त्या ऐवजी प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्र बजेट हेड करण्यासाठी जिल्हा आयुक्तालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, स्थलांतरापासून ते रेशन कार्ड पर्यंत सर्व किरकोळ बाबींसाठी मंत्रालयाकडे धाव घ्यावी लागत आहे, हे सर्व अधिकार जिल्हा परिषद स्तरावर असणे आवश्यक आहे, संबंधित वित्त विभागाचे कामकाज राज्याचे उपमुख्यमंत्री मा,ना अजित दादा पवार यांच्याकडे आहे, त्यांची वेळ निश्चित करुन शिष्टमंडळासह भेट घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून जिल्ह्यातील अनुसूचित वस्तीग्रह संस्था अडचणीत असल्या बाबतचा खुलासा व पत्रव्यवहार करण्या बाबत या बैठकीत ठराव करण्यात आला आहे, तसेच या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मा,ना, रामदास जी आठवले यांना भेटून पुणे जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या अनुसूचित व अनुदानित वस्तीग्रह संस्थांसाठी केंद्रीय योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी मिळण्याबाबत राज्य शासनास पत्र देण्याची विनंती करण्यात यावी, या संदर्भात विशाल शेवाळे, संदिपान कडवळे, आणि विकास कदम, यांनी प्रयत्न करावेत असा सर्वांमते बैठकीत ठराव करण्यात आला आहे, तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व अनुसूचित वस्तीग्रह संस्था चालकांनी नियमितपणे बैठकांमध्ये उपस्थित राहून, विचार विनिमय करून अनुसूचित व अनुदानित वस्तीग्रह संस्थांच्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी एक जुटीने प्रयत्न करावेत अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष मा गुरुमुख जी नारंग यांनी व्यक्त केली आहे, या वेळी उपस्थित जिल्हा कार्यकारणीच्या माध्यमातून विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, अनुसूचित वस्तीगृहांच्या अनुदानामध्ये वाढ करणे आवश्यक आहे, इमारत भाडे अनुदान मोठ्या प्रमाणात थकीत आहे ते मिळावे वस्तीगृह कर्मचाऱ्यांना आश्रम शाळेतील समकक्ष पदाची वेतनश्रेणी मिळावी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शासनाकडून गहू डाळ आणि तांदूळ या धान्याचा पुरवठा पूर्वी होत होता मात्र आता तो बंद झाला आहे यांचा पुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू व्हावा विद्यार्थ्यांना दोन वेळेचा नाश्ता भोजन आरोग्य आणि स्वच्छता यावर खर्च भागवण्यासाठी संस्था चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे, अर्थसंकल्प विधिमंडळ अधिवेशनात केवळ ५० टक्के तरतूद करण्यात आली आहे, ती वाढविण्यासाठी आयुक्तांनी पत्र लिहिले आहे, बजेट हेड स्वतंत्र करण्याचा मुद्दा महत्त्वाचा असुन शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे, असे अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली, या प्रसंगी बैठकीत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे अध्यक्ष गुरुमुख नारंग सचिव अशोक शहा खजिनदार शिवाजीराव चाळक महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृहाचे अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले सदस्य श्रीकांत मोरे नितीन पाटील बशीर तांबोळी संदिपान कडवळे सल्लागार राहुल मखरे उषा वाघ सुभाष चौधरी विकास कदम एस आर काळे लक्ष्मण गारे आदी पदाधिकारी व अनुसूचित वस्तीग्रह संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.