यवत येथिल सुंन्नी मुस्लिम समाजाने जपली धार्मिक परंपरा, मोहरम ताजे, ढोल ताशाच्या पारंपारिक वाद्यात भव्य मिरवणूक
By : Polticalface Team ,30-07-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,२९ जुलै २०२३ रोजी दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील सुन्नी मुस्लिम समाज बांधवांनी इस्लाम धर्मातील धार्मिक परंपरेनुसार व इस्लामी तारखे नुसार नविन वर्षाच्या सुरुवातीला मोहरम महिन्यात ताजे बसवून, पाक कुरानचे पठन करुन इस्लाम धर्मातील धार्मिक परंपरा जपत दिन कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया हाजी अकबर भाई शेख यांनी व्यक्त केली,
इस्लाम धर्मातील नियमानुसार यवत येथील सुन्नी पंथीय मुस्लिम बांधवांनी नविन वर्षाच्या सुरुवातीला मोहरम महिन्यात ताजे बसवून धार्मिक परंपरा जपत सार्वजनिक कार्यक्रम साजरा केला, मुस्लिम समाजातील पवित्र रमजान ईद नंतर महत्वाचा दुसरा सन म्हणजे बकरी ईद हा एक मोठा सन मानला जातो, तसेच मोहरम हा दुःखद महिना मानला जातो, तसेच काही मुस्लिम धर्मातील लोक मोहरमच्या सनाला स्वताच्या शरीरावर दुखापत करुन घेत असल्याचे माध्यमांमधून दर्शविले जात असल्याचे दिसून येते, या मागचे नेमके कारण तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांच्या मनात निर्माण झाल्या शिवाय राहत नाही, पूर्वकालीन इस्लाम धर्मातील (हक की लढाई) मध्ये शहिद झालेले हसेन- हुसेन यांचे इतिहासातील सुनेरी पाने उलगडून पाहिल्यास (दिन का इमान हो ऐसा) अशी अवस्था होऊन डोळ्यातुन पाणी आल्या शिवाय राहणार नाही, असा हा इस्लाम धर्मातील मोहरम चा दिवस असल्याने दुःख आणि स्वाभिमान दोन्ही गोष्टींचा मुस्लिम बांधवांना हेवा वाटत असल्याने दिन परस्ती करण्यासाठी मुस्लिम समाजातील बांधवांना त्यांच्या परस्तीती नुसार, मंक्का मदिना, काबा शरीफ, उमरा हाज यात्रा करणे बंधनकारक असल्याचे बोलले जात असुन इस्लाम धार्मिक परंपरा कायम राखली जात आहे,
यवत येथील सुंन्नी मुस्लिम समाज बांधवांनी धार्मिक परंपरा जपत दिन परस्ती करत असल्याचे मुजावर मलंग भाई तांबोळी आणि हाजी अकबर भाई शेख यांनी सांगितले, यवत येथे मोहरम ताजे बसवण्याची परंपरा अनेक वर्षापासून कायम असल्याने मुजावर,मलंग भाई तांबोळी हाजी मुबारक भाई शेख, सादिक भाई तांबोळी, रफीक भाई तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लाम धर्मातील धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले,
ताजे बसवून रंगीबेरंगी पताका लावून सजावट केली जाते, मोहरमच्या ५ तारखेला सवारी बसून मोहरमच्या ७ व ९ आणि अखेर १० तारखेला ढोल ताशा या पारंपरिक वाद्यांच्या गजरात यवत गावातुन सवारींची मिरवणूक काढण्यात आली होती, या वेळी यवत पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम समाजातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले, तसेच युवा तरुण व नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता,
यवत येथील मुजावर रफीक भाई तांबोळी यांच्या नवसाचा मोहरम (डोला) ताजे नेहमी प्रमाणे बसवण्यात आला होता, त्यांनी अतिशय आकर्षित ताजे डोला बनवून यवत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते, यवत गावच्या वतीने बशीर भाई मुलाणी याच्या देखरेखीखाली बसवण्यात येणारा डोला या वेळेस बसवण्यात आला नव्हता, मात्र पुढील वर्षी ग्रामस्थांच्या वतीने आयोजन केले जाईल असे मुजावर यांनी सांगितले,
यवत पंचक्रोशीतील हिंदू मुस्लीम बांधव या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, या वेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी सर्व नागरिकांना शरबतचे वाटप केले, युवा तरुणांनी ताजे घेऊन, मुळा मुठा कालव्यातील वाहत्या पाण्यात डोला ताजे विसर्जन केला, या वेळी प्रामुख्याने यवत ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी तसेच हिंदू मुस्लिम समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, मुजावर मलंग भाई तांबोळी हाजी मुबारक भाई शेख हाजी अकबर भाई शेख, रफीक भाई तांबोळी सादिक भाई तांबोळी, अविनाश यादव, नितिन गायकवाड शांताराम गायकवाड, महेंद्र गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष