पाटस टोल नाका परिघातील २० कि.मी. परिसरातील नागरिकांना टोलमुक्ती करावी- अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी,

By : Polticalface Team ,07-08-2023

पाटस टोल नाका परिघातील २० कि.मी. परिसरातील नागरिकांना टोलमुक्ती करावी- अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी, दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०७ ऑगस्ट २०२३ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या समस्यांबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका पदाधिकारी यांच्यावतीने पुणे-सोलापूर एक्स्प्रेसवेज प्रायव्हेट लिमिटेड पदाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून,

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ६५ वर अनेक ठिकाणी बस थांबे कमतरता , अस्वच्छ शौचलाये, वाहन चालक विश्रांती थांबे , अपूर्ण व खराब सर्विसरोड, स्ट्रीट लाईट महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध नाही , टोल उभारणी अत्यंत चुकीच्या ठिकाणी करण्यात आली असून त्यामुळे पाटस च्या परीसरतील अनेक गावाचे नागरिक बारामती या ठीकाणी सेशन कोर्ट, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, एमआयडीसी, साखरकारखाने, महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, आर्.टी.ओ, महावितरण परिमंडळ कार्यालयकडे जाताना काही फुट अंतर साठी ९० रुपये व परत येताना ४५ रुपये असा एकूण १३५ रुपये बळजबरीने टोल घेतला जात असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत आहे जातो. कोणत्या नियोजनातून चुकीच्या ठिकाणी टोल नाक्यास परवानगी देण्यात आली? त्याची समंती स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन करण्यात आली होती का ? एन एच.ए.आय. टोल फ्री क्रमांक ०१२०६२००९०० हा क्रमांक कायम बंद असून तक्रारपुस्तिका हि टोल नाक्यावर न ठेवता पार्किंग मध्ये सुरक्षा रक्षकाकडे ठेवून ग्राहकांना दिली जात नाही , धनदांडगे यांची वाहने मोफत सोडली जातात व सर्वसामान्य स्थानिक नागरिकांची टोलसाठी अडवणूक केली जाते. त्यामळे २० कि.मी. परिघातील नागरिकांना सरसकट टोल माफी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असे न झाल्यास टोल प्रशासन नागरिकांचे मुलभूत अधिकार डावलत असल्याने आपणा विरोधात फार मोठे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ,आपले प्रस्ताव, मंजूर रस्ते करार, नकाशे, अपुर्ण कामे यांची माहिती सविस्तर कागदपत्रे पुरावा देण्यात यावा, नागरिकांना माहितीसाठी नागरिकांची सनद दर्शनी भागात उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी दौंड तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्यावतीने करण्यात आली, यावेळी टोल प्रशासन अधिकाऱ्यांशी विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली असून यावेळी दौंड तालुका अध्यक्ष नामदेव होले, शहराध्यक्ष गणेश जगताप, ऋषिकेश बंदिष्टी, अपर्णा पंडित,भाऊसाहेब दुरकेर, अर्जुन थोरात, संगीता गायकवाड, किसन भागवत, कैलास पंडित, कैलास थोरात, बाळासाहेब थोरात, अभिजीत भागवत, पोपट चोरमले, अमोल भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष