दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १५ ऑगस्ट २०२३ यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विद्या विकास मंदिर शाळेच्या प्राणांगणात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण जि प सदस्य गणेश कदम यांनी केले तर विद्या विकास मंदिर हायस्कूलचे ध्वजारोहण यवत ग्रामपंचायत सरपंच समीर दोरगे यांनी केले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र,२ चे ध्वजारोहण यवत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष यादव व माजी उपसरपंच सदानंद दोरगे या मान्यवरांनी केले आहे,
या प्रसंगी यवत गावातील सर्व सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे सर यांनी शाळेच्या माध्यमातून प्रास्ताविक भाषण सादर केले, यवत पंचक्रोशीत एकुण १५ जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असुन त्यामध्ये १८५७ विद्यार्थी मुला मुली शिक्षण घेत असुन ५४ शिक्षक शिक्षिका ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले, यवत पंचक्रोशीतील जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत यवत यांच्या मार्फत विविध शाळेतील अवशक कामे करण्यात आली असून जिल्हा परिषद पंचायत समितीकडून २ वर्ग खोल्या बांधण्यात आल्या तसेच ८ वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात आली असून ग्रामपंचायत कडून १० शाळांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले, एका शाळेला रंगरंगोटी साठी एक लाख रुपये खर्च केला आहे,१० शाळांना स्मार्ट टीव्ही संच दिले आहेत ०९ शाळांना पिण्याचे पाणी वॉटर फिल्टर देण्यात आले असून यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राणांगणा स्टेज बांधकाम करून देण्यात आले असून यवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र १ दुरुस्तीसाठी १३ लाख रुपये व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र,२ दुरुस्तीसाठी ०९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे यांनी सांगितले, तसेच यवत पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे यांनी आभार व्यक्त केले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र,२ चे मुख्याध्यापिका सौ विजयालक्ष्मी कुतवळ, यवत विद्या विकास मंदिर हायस्कूलचे प्राचार्य सौ मंगल कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले,
पुर्वी यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी सकाळी गावातुन प्रभात फेरी करीत असे, तो आनंद वेगळाच होता, तत्पूर्वी गाव गाड्याती प्रमुख कारभारी भाषणातून सांगत असे, स्वतंत्र सैनिकांनी स्वतंत्र्याची चळवळ उभी केली इंग्रज भारत छोडो चा नारा दिला होता, सारा भारत देश स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाला होता, जेष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक आपल्या भाषणातुन विद्यार्थी मुला मुलींना सांगत असे,
भारत देशात अनेकांनी हुकुमत केली
तुर्की, मोगल, आदिलशाही, बादशाही, पेशवाई, इंग्रजांच्या हुकुमशाही नंतर भारत देश आझाद झाला, हा इतिहास स्वतंत्र दिनी शाळेच्या आवारात भाषणातून ऐकल्यावर देशा बंद्दल मनात अभिमान निर्माण होत असे, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी, आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत असे सांगणारे कारभारी दुर्मिळ झाले आहेत कि काय ?, गावातील गाव कारभारी गावगाड्यातील विळख्यात गुंतले आहेत, पुर्वीचा इतिहास सांगणारे लोक स्वतंत्र काळात भूमिगत झाले आहेत की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक उत्कृष्ट नृत्य कार्यक्रम सादर करुन समस्त ग्रामस्थांचे व उपस्थित पालकांचे लक्ष वेधले होते, या प्रसंगी यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव यांनी यवत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांचे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उन्नतीसाठी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करुन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, या वेळी जि प सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड,यवत ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सदानंद दोरगे,पंडीत भाऊ दोरगे, दिलीप यादव, कैलास आबा दोरगे, अशोकराव दोरगे, श्रीपतराव दोरगे, झोपडपट्टी सुरक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय डाडर तसेच यवत पंचक्रोशीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र,१ व २चे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका तसेच विद्या विकास मंदिर हायस्कूलचे प्राचार्य शिक्षक शिक्षिका समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.