यवत येथे यल्लमा देवीचा श्रावणी पाणी महोत्सव साजरा. मा.आमदार रंजनाताई कुल यांच्या हस्ते यल्लमा देवीची आरती, तृतीयपंथींच्या गायन कला नृत्याने नागरीक गेले भारावून,
By : Polticalface Team ,24-08-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २२ ऑगस्ट २०२३ रोजी दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे, येथील तृतीयपंथी (नानी) दीपा गुरु रंजिता नायक यांच्या निवासस्थानी श्रावणी पाणी यल्लमा देवीचा महोत्सव कार्यक्रम दि,२२ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथी समाजाचे (मालक) वरीष्ठ गुरुवर्य रंजीता नायक यांच्या मार्गदर्शनाखाली, कोल्हापूर चे मा शिवाजी आवळेकर, कोल्हापूर, रवी नायक येरवडा शास्त्रीनगर, रावसाहेब दादा नायक पुणे, रेखा नायक पुणे रमोला दिदी, सपना गुरु रंजीता नायक, रेनुकाताई कुंकुवाले,पुणे, बाबा गुरु सोलापूर, दिपक कदम नाव्हरे, दिलीप आडसुळ बिबवेवाडी,राजुभाऊ परदेशी येरवडा,आदी तृतीयपंथी समाजातील प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते, श्रावणी पाणी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने यल्लमा देवीची सजावट आरस करुन पारंपारिक वाद्याच्या गजरात यवत गाव पेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती,
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दौंड तालुक्याचे माजी आमदार रंजनाताई कुल, युवा नेते तुषार थोरात यांनी यवत येथील तृतीयपंथी दीपा गुरु रंजीता नायक यांच्या निवासस्थानी यल्लमा देवीच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली होती, या वेळी तृतीयपंथी समाजाचे आराध्य दैवत यल्लमा देवीची आरती, दौंड तालुक्याचे माजी आमदार रंजनाताई कुल यांच्या हस्ते करण्यात आली, या प्रसंगी पुणे जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी समाज एकत्रित जमा झाला होता, तसेच दौंड तालुक्यातील व यवत पंचक्रोशीतील यल्लमा देवीचे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते,
दौंड तालुक्याचे माजी आमदार रंजनाताई कुल, माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांचे चिरंजीव, युवा नेते तुषार थोरात, तसेच यवत पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, (नानी) दीपा गुरु रंजीता नायक यांच्या हस्ते, शाल श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला, या वेळी यवत येथील युवा तरुण कार्यकर्ते गणेश शेळके, सुरज चोरगे, रोहिदास गायकवाड, काश्मीरा मेहता, आबासाहेब दोरगे, दादा माने, आण्णा दोरगे, त्रिंबक रायकर, खुटवड, कुदळे आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते,
यल्लमा देवीचा श्रावणी पाणी महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी व भाविक भक्तांनी या वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला, रात्री उशिरापर्यंत रेणुका देवी गायन पार्टीचे मास्टर मोठा छोटा अमोल सांगलीकर यांचे गायन नृत्य मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मास्टर बडे मिया छोटे मिया अमोल सांगलीकर यांनी देवीच्या उत्कृष्ट गीत गायनाने आणि नृत्य कलाकृतीने आणि अदाकारीने उपस्थित नागरिकांचे चित्त भारावून गेले होते, या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी रेणुका गायन पार्टीचे मास्टर अमोल सांगलीकर आणि नृत्य कलावंतांचे मनापासून कौतुक केले, या वेळी (नानी) दिपा गुरु रंजिता नायक, पल्लवी गुरु दिपा, गौरी गुरु पल्लवी,वैशाली ताई भोसले, आचल गुरु दिव्या, स्वीटी गुरु लोणी, रेणुका गुरु गौरी, ममता गुरु गौरी, राधा गुरु गौरी, परी गुरु आचल, तसेच वशिका, आकांक्षा, साहिल दादा, जुली दीदी, शाईना दिली,सोनु भाऊ, यवत गावातील सामाजिक कार्यकर्ते बंडू राजगुरू, अनिल गायकवाड, काश्मीरा मेहता, राजेंद्र जैन, नवनाथ आगलावे, आदी ग्रामस्थांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष