जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या अमानुष मारहाण व गोळीबार निषेधार्थ.दौंड तालुक्यातील यवत. खुटबाव. वरवंड. गाव कडकडीत बंद.
By : Polticalface Team ,05-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०५/०९/२०२३, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथिल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा कुणबी आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने अमरण उपोषण आंदोलन करत असता
मराठा कुणबी समाजाचे महसूली कागदोपत्री पुरावे शासनाकडे मराठा कुणबी असल्याचा हा घ्या पुरावा. राज्य शासनाने जीआर काढावा.अशी रास्त भुमिका घेऊन मनोज जरांगे पाटिल यांनी मागील सहा दिवसा पासून अमरण उपोषण व आंदोलन जोराला लागले असल्याचे दिसून येत होते, पोलीस प्रशासनाने दंडीलशाहीने सदर आंदोलन उधळुन लावण्याची कामगिरी केली मराठा आरक्षण मागणीचे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना अमनुष लाठी मारहाण व गोळीबार करून सदर आंदोलन उधळुन पोलीसांनी बळाचा वापर व दंडीलशाहीने अमानुष लाठीमार करून. गोळीबार करत आंदोलन चिरडण्याचा हैदोस घालुन आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. लोकशाहीला मारक व काळीमा फासणारी राज्य सरकारची भूमिका उभ्या महाराष्ट्राच्या समोर उघकीस आली आहे. मराठा कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाज सरकार विरुद्ध पेटुन उठला आहे. जिल्हा. तालुका. व ग्रामीण.भागात याचे पडसाद दिसु लागले आहेत, दौंड तालुका पच्छिम भागातील यवत. खुटबाव. वरवंड. अशा अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावातील समाज बांधवांनी मराठा कुणबी आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटिल यांच्या अमरण उपोषणाला पाठबळ देण्यासाठी व आंदोलकांच्यावर झालेल्या अमानुष लाठी मारहाण व गोळीबार निषेधार्थ यवत खुटबाव वरवंड. ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी दि०५/०९/२०२३. रोजी गाव बंद आंदोलन करण्यात आले होते. दौंड तालुक्यातील सकल मराठा समाज एकत्रित येऊन एक दिवसीय गाव बंद आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकल मराठा समाज यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरा समोरील व्यापारी संकुलन या ठिकाणी एकत्रित येऊन एक दिवसीय कडकडीत गाव बंद आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन मराठा कुणबी आरक्षण संदर्भात सरकार विरुद्ध हल्ला बोल करत निषेध व्यक्त करण्यात आला.
खुटबाव येथे गाव बंद आंदोलन दरम्यान माजी आमदार बोलताना म्हणाले मराठा कुणबी आरक्षण मिळावे यासाठी शांततेत बसलेल्या आंदोलकांच्यावर झालेला लाठीमार हा निंदनीय प्रकार महाराष्ट्रातील मराठा समाज कदापी सहन करणार नाही. सरकारने देशातील लोकशाही संपुष्टात आनुन दंडीलशाही चालवली आहे.अशी प्रतिक्रिया दौंड तालुका माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी खुटबाव येथे निषेधार्थ बोलताना व्यक्त केली
खुटबाव वरवंड यवत येथील गाव बंद आंदोलन दरम्यान अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन निषेध केला. दौंड तालुक्यातील खुटबाव वरवंड आणि यवत येथील मराठा समाजातील नागरिकांनी मुख्य चौकातील रस्त्यावर मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
खुटबाव येथे गाव बंद आंदोलन दरम्यान दौंड तालुका माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली होती. अखिल भारतीय मराठा महासंघाचे दौंड तालुका उपाध्यक्ष संजय तात्या थोरात, माजी सरपंच शिवाजी बांपु थोरात. माजी उपसरपंच निखिल थोरात. विद्यमान सरपंच गणेश शितोळे. उपसरपंच सुधीर थोरात, युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती
यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव. जि प स.गणेश कदम. युवा नेते गणेश शेळके. माजी पंचायत समिती कुंडलिक खुटवड, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर, अशोकराव दोरगे. अरविद दोरगे. सुरज चोरगे. कैलास आबा दोरगे, श्रीपतीराव दोरगे. युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.