अनुराज शुगर्स कारखाना प्रशासन कामगारांकडून मोळी उचलून पोळी भाजून घेत आहे. ८४ कामगारांना काढले कामावरून. आठ दिवसा पासून धरणे आंदोलन सुरू.
By : Polticalface Team ,06-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०६ सप्टेंबर २०२३ दौंड तालुका यवत येथील अनुराज शुगर्स लिमिटेड साखर कारखान्यातील ८४ कामगारांना नोटीस न देता अचानक कामावरून हाकलुन दिले.असल्याने. अनुराज शुगर्स कारखान्यातील गेट समोर ८४ कामगारांचे धरने आंदोलन आठ दिवसां पासून सुरू आहे. मात्र कारखाना प्रशासनाचे कामगारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे,
अनुराज शुगर्स लिमिटेड कारखाना प्रशासनाने भीमा साखर कामगार संघटनेचे ८४ कामगार कामावर हजर असताना देखील. कारखाना प्रशासनाने दि,२८/०८/२३ रोजी कारखान्यातील कामगारांनी कोणतीही पूर्व सूचना न देता काम बंद आंदोलन बाबत असे पुणे सहाय्यक कामगार आयुक्तालयात पत्राद्वारे खोटी माहिती दिली असल्याचे युनिट ३ भीमा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरात यांनी सांगितले.
दौंड तालुक्यात कामगार कायद्यांच्या अनुषंगाने बी आर अँक्ट नुसार भीमा साखर कामगार संघटना ही कायदेशीर मान्यताप्राप्त असलेली संघटना आहे. ही सोडा आणि कारखाना सांगेल त्या कामगार संघटनेत काम करा. व लिहून द्या कारखाना सांगेल तसे काम करु संविधानिक कामगार कायद्यातील तरतुदी बाबत बोलायचे नाही. जमतंय का बघा नाही तर घरी बसा ही कारखाना प्रशासनाची भूमिका भीमा साखर कामगार संघटनेच्या कामगारांनी मान्य केली नसल्याने कामगारांची पिळवणूक केली जात आहे. अनुराज शुगर्स कारखान्याची हुकुमशाही व दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. गेली १० ते १२ वर्षापासून ३०० पेक्षा अधिक कामगार काम करत आहे. कामगार कायद्यानुसार आज पर्यंत कीती पर्मनंट झाले. कामगारांच्या सुरक्षा संदर्भात कोणते साहित्य दिले. या उलट अनुराज शुगर्स कारखान्याच्या व्यवस्थापकांनी भीमा साखर कामगार संघटनेतील १०० कामगार भूमिपुत्रांना घरी बसून एमपी राज्यातील बोगस कॉन्ट्रॅक्टर मार्फत पी एफ न देता अल्पवयीन असलेले ८० ते ८५ कामगार घेऊन स्थानिक भूमिपुत्रांनवर अन्याय केला जात नाही का ? कामगारांना घरी बसून त्यांची पिळवणूक केली जात नाही का ? कारखाना प्रशासनाला अनुराज शुगर्स कारखान्यात कामगार नको आहेत. त्यांना त्यांचे काम करण्यासाठी गुलाम पाहिजेत अशी प्रतिक्रिया अनुराज शुगर्स, युनिट ३ भीमा साखर कामगार संघटनेचे (अध्यक्ष) सचिन थोरात. (उपाध्यक्ष) कैलास दौंडकर (सेक्रेटरी) अनिल थोरात (खजिनदार) संदीप खेडेकर व सभासद कामगारांनी व्यक्त केली आहे. अशा अनेक महत्त्वाच्या विविध प्रश्नांबाबत भीमा साखर कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे चौकशी करण्याचा ठराव करून वेळ पडल्यास न्यायालयात दात मागितल्या शिवाय राहणार नसल्याचे संघटनेच्या वतीने युनिट ३ चे अध्यक्ष सचिन थोरात यांनी सांगितले आहे. दौंड तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून काढून इतर राज्यातील मजुरांना उरावर घेऊन कारखाना प्रशासन स्थानिक कामगारांची गळचेपी व कोंडी करत असल्याची प्रतिक्रिया भीमा साखर कामगार संघटनेच्या कामगारांनी व्यक्त केली आहे.
वाचक क्रमांक :