सार्वजनिक गणेश महोत्सव मंडळ. पोलीस पाटील. पत्रकारांसह यवत पोलीस स्टेशन येथे बैठक संपन्न. गणेश महोत्सवाला गालबोट लागू नये. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे
By : Polticalface Team ,08-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ८ सप्टेंबर २०२३ रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते गाव पोलीस पाटील पत्रकारांसह यवत पोलीस स्टेशन येथे दि ०६ सप्टेंबर २०२३ रोजी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये यवत पोलीस स्टेशन हद्दीतील गाव निहाय पोलीस पाटील व पत्रकारांसह सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी गाव निहाय सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे अध्यक्ष कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गणेश मंडळाने गणेश मूर्ती स्थापनेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जेणेकरून मंडळाची नोंद पोलीस स्टेशन राहिल. गावातील मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. मात्र नागरिकांना त्रासदाय होईल असा स्पीकरचा आवाज वाढवू नये. गणपती शेडमध्ये इलेक्ट्रिक वीज धक्क्यापासून सुरक्षित राहण्यासाठी महावितरण विभागाची परवानगी घेऊन वीज कनेक्शन जोडून घ्यावे. वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रत्येक गाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून
मूर्ती विसर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी सर्वत्र प्रकाश लाईट लावण्याची व्यवस्था सरपंच उपसरपंच यांनी घ्यावी. या संदर्भात गाव पोलीस पाटीलांनी सरपंच उपसरपंच यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा करावा. सार्वजनिक गणेश महोत्सव सुखरूप पार पाडवा या दृष्टीने पोलीस पाटील व पत्रकार यांनी या बैठकीत मांडलेल्या महत्त्वाच्या विषयावर पोलीस प्रशासनाचे लक्ष राहील अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या निमित्ताने मंडळांनी केलेल्या आकर्षित देखाव्यांचे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या जेष्ठ नागरिक भाविकांना व महिला मुला मुलींना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वताला सुरक्षा रक्षक समजुन त्यांची सुरक्षतेची दखल घ्यावी. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांपासून महिला नागरिकांचे संरक्षण करावे. एखादा कोणी भुरटाचोर निदर्शनास आल्यास जमावाने मारहाण न करता पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावा. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मद्यपान घेऊन लेझीम खेळणाऱ्या व हुंलडबाजी करणाऱ्याची गय केली जाणार नाही. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीबद्दल शिफारस करू नये. गणेश महोत्सवाच्या निमित्ताने भावनेच्या भरात कोणाच्या मोबाईल व्हाट्सअप फेसबुक वर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे अक्षपार्थ फोटो किंवा मेसेज आढळून आल्यास प्रतिक्रिया व्यक्त न करता पोलीस प्रशासनाला खबर द्यावी योग्य कारवाई केली जाईल. मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून डीजेच्या ध्वनी आवाजाची तीव्रता इलेक्ट्रिक साह्याने घेण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिले आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती शेडमध्ये पत्त्याचे क्लब डाव मांडून खेळ चालवु नये. शेडमध्ये पत्ते खेळताना दिसल्यास मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांवर धडक कायदेशीर कारवाई केली जाईल. ही सत्तीची वार्निंग पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी उपस्थित मंडळाच्या अध्यक्ष कार्यकर्त्यांना दिली आहे. या प्रसंगी यवत पोलीस स्टेशन येथे नव्याने आलेले ए पी आय महेश माने. पी एस आय सलीम शेख. पी एस आय आकाश शेळके. यांनी उपस्तीत मंडळाच्या अध्यक्ष कार्यकर्त्यांना ओळख करून दिली. तसेच साहाय्यक पोलीस आकाश शेळके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले गाव निहाय गणेश मंडळाच्या ठिकाणी एक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे त्यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :