यवत स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील. विद्यार्थी मुला मुलींचा गोपाळ काला. गोविंदा आला रे आला. दहिहंडीचा लुटला आनंद
By : Polticalface Team ,08-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ७ सप्टेंबर २०२३ रोजी
गोपाळ काला दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने यवत रेल्वे स्टेशन ता दौंड जिल्हा पुणे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थी मुला मुलींना रंगीबेरंगी वेशभूषा करून आगळा वेगळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला होता.
यवत स्टेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने पारंपरिक धार्मिक कला सांस्कृतिक गोपिका गोविंदांचा दहिहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी मुला मुलींनी श्रीकृष्ण. राधिका. गोपिका. गोविंदा यांची उभेऊभ वेशभूषा करुन उपस्थित विद्यार्थी पालकांचे व नागरीकांचे लक्ष वेधले होते. गोविंदा आला रे आला दहीहंडी फोडू चला. या प्रसंगी विद्यार्थी मुला मुलींनी विविध पारंपारिक दहीहंडीच्या गीतांवर नृत्य सादर करून
उपस्थित विद्यार्थी पालकांचे आणि यवत रेल्वे स्टेशन परीसरातील नागरीकांचे मनोरंजन केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या
मुख्याध्यापिका सो.जयश्री रायकर बोलताना म्हणाल्या कि विध्यार्थ्यांना आपले पारंपरिक सांस्कृतिक सण व उत्सवांचे महत्त्व शाळेतील लहान मुला मुलींना कळावे. म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे शाळेमध्ये आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता
करण्यात झाली. या प्रसंगी केंद्रप्रमुख श्री प्रणय कुमार पवार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री रायकर , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सौ.दिपाली थोरात, शिक्षक श्री रामहरी लावंड. श्री अनिल हुंबे. सौ.संगिता टिळेकर. सौ.संगिता वाळके. तसेच यवत रेल्वे स्टेशन परीसरातील विद्यार्थी पालक महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती युवा तरुण कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :