दौंड विधानसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्ती सुदाम सोपान राजवडे यांनी घेतली आमदार राहुल कुल यांची भेट, दौंड शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रा बाबत नाराजी व्यक्त.
By : Polticalface Team ,11-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता. १० सप्टेंबर २०२३ रोजी दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार अँड राहुल कुल यांच्या निवासस्थानी रविवार दि १० सप्टेंबर २०२३ रोजी तालुक्यातील विकासात्मक सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील नागरीकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा करून राहुल कुल यांच्या उपस्थितीत सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने. दौंड विधानसभा मतदार संघातील नागरिकांची सकाळपासूनच आमदार राहुल कुल यांच्या मौजे राहु ता दौंड जिल्हा पुणे येथील निवासस्थानी आमदार राहुल कुल आणि त्यांचे पीऐ शिर्के. माने. थोरात. जाधव. मामा. हे नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत दर रविवारी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच आरोग्य संदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न. सोडवण्याचा प्रयत्न आमदार राहुल कुल करत असतात. या प्रसंगी
मौजे नंदादेवी ता दौंड जिल्हा पुणे. येथील. विद्यार्थिनी कु.राखी हरिचंद्र चव्हाण.११ वी (सायन्स) व्ही पी कॉलेज. समाज कल्याण विभागाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वस्तीगृह बारामती. जिल्हा पुणे. येथे कु.राखी हरिचंद्र चव्हाण विद्यार्थिनीस खास बाब म्हणून प्रवेश मिळण्या बाबत
व्ही पी कॉलेज चे व्यवस्थापक यांच्याकडून सहकार्य व्हावे असे विनंती पत्र आमदार राहुल कुल यांनी दिले. तसेच दौंड विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे वैयक्तिक वाद विवाद संपुष्टात आणण्यासाठी वादी प्रतिवादी यांच्यात सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शासकीय सेवेतील कर्मचारी यांच्या नाकर्तेपणाची दखल घेऊन. त्यांचा चांगलेच समाचार घेऊन खरपूस खरडपट्टी करण्यात आली. या प्रसंगी दिव्यांग.सुदाम सोपान राजवडे वय वर्षे ५६ रा कासुर्डी जावजी बुवाचीवाडी ता दौंड जिल्हा पुणे.यांनी बोलताना सांगीतले पुर्वी पुणे सोलापूर महामार्गावर भिषण अपघातात थोडक्यात जीव बचावला आहे. डोक्याला गंभीर दुखापत होऊन शरीराची मोडतोड झाली होती. दोन वेळा शस्त्रक्रिया झाली नसती तर कदाचित जीवंत दिसलो नसतो.
या अपघातात एक डोळा पूर्णपणे निकामी झाला असल्याने. दौंड शहरातील शासकीय रुग्णालयात दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून गेलो होतो. दि,२२/०८/२०२३ रोजी ३० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांकडून देण्यात आले. या संदर्भात शंका उपस्थित करत. राजवडे म्हणाले कदाचित एक डोळा पूर्णपणे निकामी झाला असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले नसावे ? अशी खोचक प्रतिक्रिया दिव्यांग सुदाम राजवडे यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना म्हणाले या प्रमाणपत्राचा मला कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ होईल असे वाटत नाही. किमान ४० टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीला शासकीय योजनेतून लाभ देण्याची तरतूद आहे. दौंड येथील शासकीय रुग्णालयातील दिव्यांग विभागातील वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा कार्याबद्दल सुदाम सोपान राजवडे यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रसंगी दौंड विधानसभा मतदार संघातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील शेकडो युवा तरुण जेष्ठ नागरिक. तसेच वैयक्तिक आरोग्य शस्त्रक्रिया संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांचे आमदार राहुल कुल यांनी समाधानकारक निवारण केले असल्याचे मतदारांनी सांगितले.
वाचक क्रमांक :