यवत व्यापारी संघनेच्या वतीने. दिनेश जैन. उद्योजक योगेश भाऊ मगर.यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By : Polticalface Team ,12-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १२ सप्टेंबर २०२३ यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील दुकानदार व्यापारी संघनेच्या वतीने. दिनेश भाऊ जैन. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील व दौंड शहर येथील उद्योजक योगेश भाऊ मगर. पत्रकार अनिल गायकवाड. यांच्या हस्ते.यवत पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त. कोल्हापूरी फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी. तसेच दौंड शहरातील उद्योजक योगेश भाऊ मगर. देलवडी येथील भाऊसाहेब बंड. उरुळी कांचन येथील शक्ती भाऊ बडेकर. यांनी यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवरांना त्यांना भेटण्याचा मोह अवरता आला नाही. एका पाठोपाठ केक घेऊन अनेक मांन्यावरांची रांग लागलेली बघुन. स्वाता हेमंत शेडगे साहेब बोलताना म्हणाले मी सकाळ पासून कोणासही कळु दिले नाही. तुम्हाला कसे समजले वाढदिवस आहे. मला अनेक फोन आले तेव्हा मी या विषयी टाळण्यासाठी तसं काही नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावर उपस्थित मान्यवरांच्यात हास्य निर्माण झाले होते. यवत पोलीस स्टेशन येथे आलेल्या मांन्यावरांनी पुष्पगुच्छ देऊन जन्म दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मा,हेमंत शेडगे साहेब यांनी उपस्थित मान्यवरांची विनंती स्विकारुन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी आभार व्यक्त केले. तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती मंडळाच्या युवा तरुण कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी जोपासण्याची दखल घ्यावी अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केली.
वाचक क्रमांक :