अनुराज शुगर्स कारखाना प्रशासनाला पुणे अप्पर कामगार आयुक्तांचा दणका ८४ कामगारांना तत्काळ कामावर घेण्याचे आदेश.
By : Polticalface Team ,14-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १४ सप्टेंबर २०२३ अनुराज शुगर्स साखर कारखान्यातील ८४ कामगारांना नोटीस न देता कामावरून हाकलुन दिले. भीमा साखर कामगार संघटनेचे ८४ कामगार कामावर हजर असताना देखील. कारखाना प्रशासनाने दि,२८/०८/२३ रोजी कामगारांनी कोणतीही पूर्व सूचना न देता काम बंद आंदोलन केले बाबत. पुणे सहाय्यक कामगार आयुक्तालयात पत्राद्वारे खोटी माहिती दिली होती. भिमा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरात यांनी ८४ कामगारासह दि.३० रोजी पासुन अनुराज शुगर्स कारखाना गेट समोर धरणे आंदोलन सुरू केले होते.
या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या मा वैशाली ताई नागवडे यांनी भिमा साखर कामगार संघटनेच्या ८४ कामगारांची धरणे आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली. कामगारांच्या समस्या बाबत व मागणी संदर्भात चर्चा करून राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्याशी संपर्क साधून दौंड तालुक्यातील भूमीपुत्रांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार बाबत आंदोलकांच्या समस्येवर चर्चा करून व्यथा मांडली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी
भिमा साखर कामगार संघटनेच्या ८४ कामगारांच्या धरणे आंदोलनाची दखल घेऊन, तत्काळ मा अप्पर कामगार आयुक्त पुणे यांच्याशी संपर्क करुन आयुक्तांशी चर्चा मसलत करण्यात आली असल्याने. भिमा साखर कामगार संघटनेच्या दि०६/०९/२०२३ रोजी ई-मेल द्वारे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने कामगारांच्या धरणे आंदोलना बाबत. मा अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग. यांच्या समोर दि.१४/०९/२०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यवस्थापना तर्फे टाईमकिपर उपस्थित होते. मात्र अनुराज शुगर्स कारखाना व्यवस्थापकिय अधिकारी किंवा स्वात: मालक या बैठकीत उपस्थित राहु शकले नाहीत. त्यामुळे मा अप्पर कामगार आयुक्तांनी अनुराज शुगर्स कारखाना व्यवस्थापक विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भिमा साखर कामगार संघटनेच्या ८४ कामगारांना तत्काळ कामावर घेणे बाबत पत्राद्वारे अनुराग शुगर्स कारखाना प्रशासनाला सुचित करण्यात आले आहे.
भिमा साखर कामगार संघटनेचे दि ०६/०९/२०२३ रोजी ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मा अपर कामगार आयुक्त पुणे विभाग यांच्या समोर चर्चेकरिता त्यांच्या दालनात पुन्हा दि २५/०९/२०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्यामध्ये अनुराग शुगर्स कारखाना वेवस्थापकांनी कागदपत्र अभिलेख अधिकार पत्रासह स्वतः उपस्थित रहावे अशी सुचेना पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यात कामगार कायद्यांच्या अनुषंगाने बी आर अँक्ट नुसार भीमा साखर कामगार संघटना ही कायदेशीर मान्यताप्राप्त असलेली संघटना आहे.
ही सोडा आणि कारखाना सांगेल त्या कामगार संघटनेत काम करा. व लिहून द्या कारखाना सांगेल तसे काम करु संविधानिक कामगार कायद्यातील तरतुदी बाबत बोलायचे नाही. जमतंय का बघा नाही तर घरी बसा ही कारखाना प्रशासनाची भूमिका भीमा साखर कामगार संघटनेच्या कामगारांनी मान्य केली नसल्याने कामगारांची पिळवणूक केली जात होती. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या मा वैशाली ताई नागवडे यांच्या प्रयत्नातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत आंदोल कर्त्यांची वार्ता पोचवली असल्याने तत्काळ पुणे विभाग मा अप्पर कामगार आयुक्तांनी दखल घेऊन यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथील अनुराज शुगर्स कारखाना प्रशासनाला सुचना करण्यात आली आहे. भीमा साखर कामगार संघटनेच्या ८४ कामगारांना तात्काळ कामावर घेणे बाबत पत्राद्वारे सुचना करण्यात आली आहे. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या वैशाली ताई नागवडे यांचे भीमा साखर कामगार संघटनेचे (अध्यक्ष) सचिन थोरात. (उपाध्यक्ष) कैलास दौंडकर (सेक्रेटरी) अनिल थोरात (खजिनदार) संदीप खेडेकर व सभासद कामगारांनी आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक :