सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त उरुळी कांचन येथे भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा फलकाचे उद्घाटन. पंचशिल ध्वजाला दिली सलामी.

By : Polticalface Team ,18-09-2023

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त उरुळी कांचन येथे भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा फलकाचे उद्घाटन. पंचशिल ध्वजाला दिली सलामी. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १७ सप्टेंबर २०२३ रोजी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने रविवार दि १७ सप्टेंबर २०२३ रोजी उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी (दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पूर्व हवेली तालुका अध्यक्ष सुनील अवचार. उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे. उरुळी कांचन चे सरपंच भाऊसाहेब कांचन. विद्यमान सदस्य शंकर बडेकर. महिला सचिव निलिमा ताई कांबळे. आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी समता सैनिक दलाच्या जवानांनी पंचशील ध्वजाला सलामी देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याची पार्श्वभूमी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचवण्याची जबाबदारी व कामगिरी धम्म सेवक उपासक उपासिकांनी बजावली पाहिजे अशी प्रतिक्रिया बी जी घाटे सर त्यांनी बोलताना व्यक्त करुन. उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी तत्पूर्वी केलेल्या समाज सुधारणेच्या कार्याची जाणीव उपस्थित समाज बांधवांना करून दिली. तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर. यांनी प्रथम देहू रोड येथे तथागत गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना करून समाजाला बौद्ध धम्माची ओळख पटवून नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तत्पूर्वी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी काळ आडवा आला. मात्र व्यवस्था निश्चित करून ठेवली होती. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून पंचशील अष्टांगिक मार्ग. चार आर्य संत्य. करुणा मैत्री.भावना. सत धम्माचा व दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी मुक्ती कोण पथे. तसेच अनेक पुस्तकाच्या लिखाणातून समाज जागृती केली. असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येकाला एक दिवस मृत्यू ची भेट घ्यावी लागणार हे अटळ सत्य असल्याची जाणीव करून दुःख मुक्तीच्या मार्गाने जीवन जगले म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा धंम्म हा विज्ञानवादी आहे. कर्मकांडाला थारा नाही. वर्तमान जीवणा शिवाय दुसरा पर्याय नसल्याची समाजाने खुनगाठ बांधली पाहिजे. या पुढे आपले जीवन.(अप्त दीप भव) तथागत गौतम बुद्धांच्या धम्म मार्गाने स्वयंम प्रकाशित व्हा. या मार्गाने जाण्याचा संकल्प करावा अशी प्रतिक्रिया बी जी घारे सर यांनी व्यक्त केली. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. तसेच उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे. भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. (अध्यक्ष पदी ) कैलास शिंदे. (सरचिटणीस पदी ) परमेश्वर कदम (कोषाध्यक्ष पदी ) सखाराम ओव्हाळ. या पदअधिकारी मान्यवरांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उरुळी कांचन परिसरातील समता सैनिक दलाचे जवान. व उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. या प्रसंगी सुरेखाताई मखरे आणि पूर्व हवेली महिला सचिव निलिमा ताई कांबळे यांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.