सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने यवत गावातील बाजार पेठेच्या रस्त्यावर दुकानांची मांदीआळी मुख्य रस्ता चक्का जाम वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर
By : Polticalface Team ,19-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १९ सप्टेंबर २०२३ सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने यवत गावातील बाजार पेठ. गजबजून केली आहे. मंगळवार दि,१९ सप्टेंबर २०२३.रोजी गणेश मूर्ती प्राण प्रतिस्थापनेची तयारी करण्यासाठी गणेश भक्तांची धावपळ दिसून येत असल्याने यवत तालुका दौंड जिल्हा पुणे. येथील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूच्या दुकानांन समोर. यवत गावातील बाजार पेठेला पुण्यातील सोमवार पेठेचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून येत आहे. बाजार पेठेतील दुकानांची मांदीआळी पाहता अपुरी जागे अभावी वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर दिसून येतो. या विषयी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गणेश मूर्ती प्राण प्रतिस्थापनेच्या दिवशी व गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी बाजार पेठेच्या लगतच्या रस्ता मार्गाने येणे जाण्याचा प्रयत्न करावा अन्यथा वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता नाकरता येणार नाही.याची नागरिकांनी व गणेश भक्तांनी दक्षता घ्यावी..
( सार्वजनिक गणेश उत्सवाला गाल बोट लागेल अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये. याची काळजी घेऊन आनंदाने गणेश उत्सव साजरा करावा अशी प्रतिक्रिया यवत गावातील समस्त ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.)
सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने यवत बाजार पेठेतील दुकानांमध्ये गणपती सजावटीचे
आकर्षित वस्तूंची खरेदी विक्री साठी दोन दिवसा पासून आधिच गणेश भक्तांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गणेश मूर्ती विक्री स्टॉलवर तरुण मंडळाचे युवा कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थांच्या घरी गणेश मूर्ती बसवणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात लगबग दिसून येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गणपती मंडळाच्या युवकांची मोठी धावपळ दिसत आहे. स्टॉल वर दुकानात गणेश मूर्ती सुंदर आकर्षित व मोठ्या साईज मध्ये आढळून आल्यास बजेट मध्ये बसेल अशी गणेश मूर्ती शोधण्याची कसरत मंडळातील कार्यकर्त्यांनी दोन दिवस आधी पासूनच सुरू केली असल्याने. यवत येथील बाजार पेठ नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे.
यवत गाव हे पुणे सोलापूर महामार्गावर असल्या कारणाने परीसरातील वाड्या वस्त्या व खेड्या पाड्याच्या गावातील गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ नेहमीच दिसून येते.
त्यामध्ये मंडळाचे युवा कार्यकर्ते गणेश मूर्ती घेऊन जात असताना पारंपारिक ढोल ताशा वाद्याच्या गजरात गणेश फक्त आनंदाने भारावून गेल्याचे दिसून येत आहे. ( सार्वजनिक गणेश उत्सवाला गाल बोट लागेल अशी कोणतीही परस्तीती निर्माण होऊ नये. याची दक्षता घेऊन. आनंदाने गणेश उत्सव साजरा करावा अशी प्रतिक्रिया यवत गावातील समस्त ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.)
वाचक क्रमांक :