स्कार्पिओ गाडीतून हातभट्टी दारुची वाहतूक. ४ लाख ९० हजार. किमतीचा मुद्देमालासह दोन आरोपी यवत पोलिसांच्या जाळ्यात.
कायदेशीर गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,21-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २० सप्टेंबर २०२३ रोजी मौजे कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे सोलापूर महामार्गावरील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील कासुर्डी टोल नाका येथे पोलीस नाका बंदी करत असताना स्कार्पिओ क्र.एम एच १२ ई. जी. ११४१ या वाहनातून ३० काळे रंगाचे प्लास्टिक कॅन्डमध्ये १०५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारुची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात सापडले असल्याने त्यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी. अजित शिवाजी काळे. नेमणूक यवत पोलीस स्टेशन. यांनी सरकार तर्फे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम म ६५ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी १) शौकत आली हसन पटेल.३८ वर्ष मार्केट यार्ड गल्ली नंबर ४ बिबेवाडी पुणे. मुळ रा. खेडा.ता. अबजलपुर.जि. कलबुर्गी राज्य कर्नाटक. २) दत्ता कुमार चव्हाण. २२ वर्ष सध्या रा. मार्केट यार्ड गल्ली नं,४ बिबेवाडी पुणे. मुळ रा.निलंगा जि. लातुर. यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदर घटना मौजे कासुर्डी ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत कासुर्डी टोल नाका येथे दि.२०/०९/२०२३. रोजी सदर घटना समोर आली आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील मौजे कासुर्डी टोल नाक्यावर यवत पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान राखाडी रंगाची स्कार्पिओ मध्ये प्लास्टिकच्या काळे रंगाचे ३० कॅन्डमध्ये प्रत्येकी ३५ लिटर गावठी हातभट्टी तयार दारू आढळून आली असून. ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली. यवत पोलिसांनी कामगिरी बजावली आहे.
मौजे कासुर्डी ता.दौंड जि. पुणे गावचे हद्दीत कासुर्डी टोल नाका येथे सोलापुर ते पुणे बाजुकडे जाणारे लेनवर नाकाबंदी करीत असताना आरोपींच्या ताब्यातील स्काॅर्पिओ वाहन क्र.एम.एच.१२ ई.जी.११४१ यामध्ये ३० काळे रंगाचे प्लॅस्टीकचे कॅन्ड त्यामध्ये १०५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू मानवी शरीराला गुंगविणारी हानिकारक अल्कोहोल मिश्रित मानवी शरीरास इजा किंवा दुखापत होण्याची जाणीव असुन ही त्याचे विक्री करीता स्कार्पिओ गाडीतून घेवुन जात असताना सदर आरोपी रंगेहाथ
मुद्देमालासह मिळुन आले असल्याने त्याचे विरूध्द भा.द.वि.का.कलम ३२८.३४. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९. चे कलम ६५ (क), नुसार. सरकार तर्फे कायदेशिर फिर्याद करण्यात आली आहे. दाखल अंमलदार पो ह वा जगताप पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :