दौंड तालुक्यातील रिक्त १४ गाव कोतवाल पदांची भरती.१० ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत. दौंड तहसीलदार अरुण शेलार.
By : Polticalface Team ,30-09-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ३० सप्टेंबर २०२३ दौंड तालुक्यातील एकुण १७ गावातील कोतवाल पदे रिक्त असुन त्या पैकी. १४ गाव कोतवाल पदाची भरती आरक्षण प्रक्रियेच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आली असल्याचे दौंड तालुका तहसीलदार अरुण शेलार यांनी सांगितले.
दौंड तहसील कार्यालयात शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी १४ गाव कोतवाल पदाचे जातीनिहाय आरक्षण निश्चित करुन जाहीर करण्यात आले. असुन २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत कोतवाल पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
दौंड तालुक्यातील गाव निहाय प्रवर्गानुसार आरक्षण. १) हिंगणीबेर्डी अनुसूचित जाती. २) देऊळगाव राजे अनुसूचित जमाती. (महिला) ३) नांदूर भटक्या जमाती (ब) ४) पोरीपाधीं भटक्या जमाती (क) ५) खामगाव भटक्या जमाती (ड) ६)गिरीम विशेष मागास प्रवर्ग.७) दापोडी इतर मागास प्रवर्ग. ८) पिंपळगाव इतर मागास प्रवर्ग. ९) दहिटणे इतर मागास प्रवर्ग. १०)बोरवेल इतर मागास प्रवर्ग.११) दौंड इतर मागास प्रवर्ग (महिला) १२) पाटस इतर मागास प्रवर्ग (महिला) १३) केडगाव आर्थिक दृष्ट्या दुर्बळ.
(EWS) १४) पारगाव आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS) महिला. या प्रवर्गानुसार रिक्त गाव कोतवाल पदाची भरती करण्यात येणार आहेत.
दौंड तहसील कार्यालय येथे दिनांक २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पर्यंत शासकीय सुट्ट्या वगळून अर्जदारांनी विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज दाखल करायचे आदेश दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी काढले आहेत.
दौंड तालुक्यातील रिक्त १४ गाव निहाय कोतवाल पदाची लेखी परीक्षा १५ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार असून १८ ऑक्टोबर २०२३ रोजी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे दौंड तहसीलदार मा अरुण शेलार यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील रिक्त गाव कोतवाल पदाच्या भरतीसाठी. उमेदवार ४ थी उत्तीर्ण असावा. मराठी भाषा. लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष इतके असावे. उमेदवार गावात रहिवासी असावा. अशा अवश्यक शासनाने लागू केलेल्या अटी नियमांच्या अनुषंगाने गाव निहाय कोतवाल भरती प्रक्रिया होणार असल्याचे दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी सांगितले असून या दरम्यान कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास अर्जदारास तात्काळ अपत्र ठरवण्यात येईल असेही त्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :