पारगाव शालुमालु येथिल युको बँकेत महिलेच्या हातातील १२ हजार ५०० रुपये हिसकावून.भामटा गेला पळुन. नागरीकांच्या सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित. पैसे चोरल्याची दिली कबुली आरोपी जेरबंद.
By : Polticalface Team ,05-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०४ ऑक्टोबर २०२३ दौंड तालुक्यातील मौजे पारगाव शालु मालु येथिल. युको बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातातील १२ हजार ५०० रुपये हिसकावून अज्ञात चोरटा बेपत्ता झाला असल्याने पारगाव शालुमालु येथे मुख्य चौकात एकाच खळबळ उडाली होती. सदर घटना मौजे पारगाव शालुमालु ता दौंड जिल्हा पुणे येथिल युको बँकेत घडली असल्याने नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पारगाव येथिल रहिवासी वैभव ताकवणे यांची (आत्या) सौ मिना राजेंद्र ढोरजकर ५० वर्ष रा निमोणे ता शिरुर जिल्हा पुणे. ह्या वैयक्तिक कामासाठी पारगाव येथे आल्या होत्या. दोन एकर शेतजमीन १० वर्षासाठी खंडाने देण्याची बोलणी (भाचे) वैभव ताकवणे याच्या बरोबर झाली होती त्या मोबदल्यात सौ मिना राजेंद्र ढोरजकर यांच्या बँक खात्यात १ लाख रुपये भरण्यासाठी भावजय सविता ताकवणे.भाचे वैभव ताकवणे आणि सौ मिना राजेंद्र ढोरजकर. पारगाव येथिल युको बँकेत गेले होते. वैभव ताकवणे बँकेत पैसे भरण्याची स्लिप लिहित होते तर आत्या सौ मिना राजेंद्र ढोरजकर यांच्या जवळील पाचशाच्या नोटा जुळत होत्या. मात्र बाजुला उभा असलेला एक अनोळखी व्यक्ती दबा धरून इकडे तिकडे पाहत होता. तो अचानक पुढे आला व म्हणाला माऊशी नोटांना वेवस्थित लब्बर लावा..द्या इकडे मी लावतो लब्बर. असे म्हणुन हातातील १२. हजार ५०० रुपये घेऊन पळुन गेला. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. आत्या मिना राजेंद्र ढोरजकर यांना क्षणभर काही सूचेनासे होऊन डोळ्यांना अंधाऱ्या व गुंगवल्यासारखे झाले असल्याचे त्यांनी वैभव ताकवणे यांना सांगितले, मात्र तोपर्यंत अनोळखी व्यक्ती पसार झाला होता. त्या वेळी युको बँकेच्या परीसरात एकच खळबळ उडाली होती चोरट्याने कोणास थांग पत्ता लागू दिला नाही. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता सदर व्यक्ती इकडे तिकडे पाहत निरीक्षण करत असल्याचे दिसुन येत आहे. सदर घटनेची तक्रार देण्यासाठी वैभव ताकवणे व आत्या सौ मिना राजेंद्र ढोरजकर पोलीस स्टेशन येथे पोचले. घडला प्रकार सांगुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या वेळी अचानक समजले की यवत ते खुटबाव डांबरी रोड येथील जगताप फार्म जवळ स्कुटी मोटर सायकल व बुलेट मोटर सायकलचा समोरा समोर अपघात झाला आहे. कदाचित हा पैस चोरणारा भामटा खुटबाव मार्गी यवतकडे भरधाव वेगाने जाताना अपघात झाला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही, असा विचार करून वैभव ताकवणे पोचले तर काय सीसीटीव्ही कॅमेरे मधील मास लावलेल्या व्यक्तीचा आणि स्कुटी चालकाचा पेराव सारखाच दिसुन येत असल्याने. यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या समोर त्याला हजर केले तेव्हा चौकशी दरम्यान त्याने पत्नीच्या ऑपरेशनसाठी पैसे चोरल्याची कबुली दिली. त्या वेळी २२ हजार ५०० रुपये त्यांच्याकडे सापडले असल्याचे वैभव ताकवणे यांनी सांगितले आहे.
यवत ते खुटबाव डांबरी रोड येथील जगताप फार्म जवळ स्कुटी मोटर सायकल व बुलेट मोटर सायकलचा समोरासमोर अपघात झाला
त्यामध्ये सखाराम पिरतु हंडाळ ४० वर्ष रा हंडाळवाडी केडगाव ता दौंड जिल्हा पुणे. हे गंभीर जखमी झाले आहेत घडला सर्व प्रकार यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या निदर्शनास आला. सदर घटनेची चौकशी दरम्यान स्कुटी वरील चालक इब्राहिम बाबू इराणी.५४ वर्ष रा शिवाजी नगर. पुणे या आरोपीस ताब्यात घेतले असुन
फिर्यादी सौ मिना राजेंद्र ढोरजकर यांच्या तक्रारीवरून.गु र नं १२९३/ २०२३ भा द वी. कलम ३९२ अंन्वये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच यवत ते खुटबाव डांबरी रोड येथील जगताप फार्म जवळ अपघातातील स्कुटी मोटरसायकल एम एच १२ टी जी ५९३४. वरील स्कुटी चालक आरोपी विरुद्ध सरकार तर्फे फिर्यादी उमेश सोपान गायकवाड. नेमनुक यवत पोलीस स्टेशन.येथे दि.०४/१०/२०२३ रोजी गुन्हा दाखल अंमलदार मपोसई मटाले. अंमलदार अधिकारी पो हवा दौंडकर व सपोनि बारवकर पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :