पुणे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या दूषित पाणी प्रदूषणामुळे. भिमा नदी पात्रातील जलपर्णीची समस्या कायम. दूषित पाणी प्रक्रिया करण्याची मागणी. आमदार राहुल कुल.
By : Polticalface Team ,11-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ११ ऑक्टोबर २०२३.पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या दूषित पाणी प्रदूषणामुळे. मुळा मुठा व भीमा नदी पात्रातील जलपर्णी त्रासदायक ठरत असुन. भिमा नदी काठावरील गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सतत निर्माण होत असुन. ही समस्या कायम आहे.
पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरा बाबत प्रश्न उपस्थित करुन संबंधित अधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. भिमा नदी पात्रातील दूषित पाणी व जलपर्णी समस्या बाबत आमदार राहुल कुल यांनी पावसाळी आधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करुन कार्यवाहीची मागणी केली होती. त्यानुसार नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव मा.डॉ.के.एच.गोविंदराज यांच्या अध्यक्ष ते खाली मंत्रालयात बैठक पार पडली,
या बैठकीमध्ये आमदार राहुल कुल यांनी मुळा मुठा व भीमा नदीच्या दूषित पाण्यामुळे दौंड हवेली व इंदापूर तालुक्यातील. ग्रामीण भागातील नदी बाजुचे नागरिक त्रस्त झाले आहेत, दूषित पाणी प्रदूषणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे व पशु संवर्धनाचे आरोग्या धोक्यात आले असुन विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः उन्हाळ्यात जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडतो, नदीतील जलजीवांवर विपरित परिणाम दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने डासांची निर्मिती होऊन. मोहळा प्रमाणे प्रचंड हल्ला करुन नागरिकांची बेचैन अवस्था झाल्या शिवाय राहत नाही.
शेतकरी दिवसभर शेतात काम करुन थकलेल्या अवस्थेत रात्री शांत झोप लागत नाही. ( एक मच्छर आदमी को टाळी बजाने मजबुर कर देता है.)
जलपर्णीला आळा घालण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात यावी, आधुनिक तंत्रज्ञान वापरून या बाबत कायस्वरूपी उपाय योजना करण्यात याव्यात.
खडकवासला धरण साखळीतून पुणे महानगरपालिकेद्वारे मंजूर ११.५ टिमसी कोट्याहुन अधिक पाणी वापर होत असल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यावर मर्यादा येत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे याबाबत अतिरिक्त वापर झालेले पाणी पुनर्प्रक्रिया करून सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांची योग्य कार्यवाही होईल असे आश्वासन मा.डॉ.के.एच. गोविंदराज यांनी दिले या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री विक्रम कुमार, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :