यवत पोलीस स्टेशन येथे कंजार समाजाचा आक्रोश, लाख रुपये दिले तर बरे नाही तर गुन्हे दाखल. कंजार महिलांची प्रतिक्रिया. ज्वाला सिंगने घेतली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची भेट.
By : Polticalface Team ,14-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता. १४ ऑक्टोबर २०२३. दौंड तालुक्यातील मौजे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पिढीजात हातभट्टी दारू विक्रीत्यांचा यवत पोलीस स्टेशन समोर काही पोलीसांच्या विरुद्ध आक्रोश करण्यात आला. गेली दिड वर्षा पासून वेळोवेळी यवत पोलीसांनी धुमाकूळ घातला आहे. छापेमारी करुन लाखो रुपयांची मागणी केली जात आहे. तशी तजबीज न झाल्यास. पुरुष महिला व मुलांनवरती यवत पोलीस स्टेशन येथे भा द वि कलम ३२८. महाराष्ट्र दारुबंदी कायदा क.६५ (ख( (ग) (च) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये दौंड तालुका पच्छिम भागातील देवकर वाडी. केडगाव.२२ फाटा. हिंगणीगाडा. पिलानवाडी. खामगाव.वाखारी ता दौंड जिल्हा पुणे येथील तब्बल एका कुटुंबातील दोन ते तीन लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मार्च महिन्यात मृत्यू झालेल्या देवानंद मुकारम नानावत याचे नाव असल्याचे उपस्थित महिलांनी बोलताना सांगितले. मार्च महिन्यात केडगाव २२ फाटा येथे पोलिसांनी छापेमारी केली त्यावेळी पोलिसांच्या धावपळीत छोटा हत्ती टेम्पोचा अपघात झाला. त्यामध्ये देवानंद मुकारम नानावत याचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचापण मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्व कुटुबाची वाताहात झाली अशी माहिती उपस्थित कंजार समाजातील महिला व पुरुषांनी बोलताना दिली. तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीत हे साहेब आल्या पासून. सर्व अवैद्य धंन्दे राजरोसपणे व जोमाने सुरू झाले आहेत. आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
यवत भांडगाव चौफुला केडगाव पाटस येथील बेकायदेशीर कल्याण मटका बाजार मेन मुंबई बाजार सोरट संट्टा जुगार महामार्गावरील हॉटेल ढाब्यानवर बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष का ? केले जात आहे. हि मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे. वसुली पथक जोरदार कामगीरी बजवत असल्याचे दिसून येत आहे. यवत पोलिसांनी या भागातील अवैद्य धंदेवाल्यांवर कोणती कारवाई केली.असा थेट सवाल उपस्थित महिला पुरुषांनी केला आहे.
यवत पंचक्रोशीतील कंजार समाजातील जनसमुदाय मोठ्या संख्येने यवत पोलीस स्टेशन येथे एकत्रित जमा झाला होता. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून प्रशासनालाच धारेवर धरण्यात आले असल्याने. पोलीस प्रशासना समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील गावठी हातभट्टीची दारु तयार व विक्री करणाऱ्या पिढीजात समाजाचे प्रख्यात असलेले. ज्वाला सिंग यांनी यवत पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची भेट घेतली.
समाजावर होणा-या अन्याया विरुद्ध बोलताना ते म्हणाले आमचा पिढीजात हातभट्टी दारू तयार व विक्री करण्याचा व्यवसाय आम्ही बंद करतो आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीता शासनाने उपाय योजना कराव्यात. जमीन उद्योगधंदे उपलब्ध करून जगण्याचे साधन निर्माण करावे.असे मत ज्वाला सिंग यांनी व्यक्त केले. या वेळी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व कंजार समाजातील दामू बारोट्या नानावत संदेश अर्जुन नानावत आकाश गोविंद अर्जुन नानावत सागर गोविंदा नानावत अक्षय विठ्ठल नानावत पवन लालू नानावत अंतरा रमेश गुडदावत विश्वात्मा मनावत. आदी महिला बाळ गोपाळांचा मेळाव्यात समावेश झाला होता. यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे संबंधित पोलिसांन विरुद्ध कारवाई करतील काय ? असा प्रश्न उपस्थित नागरिकांमध्ये केला जात आहे. तसेच यवत येथिल वाढती दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद विवाद उफाळून येऊ लागले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे तत्काळ बंद करण्या बाबत समस्त ग्रामस्थांच्यात चर्चा केली जात आहे.
वाचक क्रमांक :