दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १४ ऑक्टोबर २०२३. दौंड तालुका पच्छिम भागातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथे पारंपरिक बैल पोळा उत्सवाच्या निमित्ताने यवत येथील शेतकऱ्यांनी आकर्षित खिल्लारी बैल जोडीला रंगी बेरंगी बेगडी लावून सजविण्यात आले होते. शेतकऱ्यासाठी बैल जोडीचा छंद हा वेगळाच असतो. डी जे आणि हलगी लावून फटाक्यांच्या धुम धडाक्यात यवत गावातुन बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती.
या मध्ये आकर्षित खिल्लारी बैल जोडी
पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून आली. यवत येथील शेतकरी बबन तात्या दोरगे.आणि छबन भाऊ कुदळे यांची मानाची किल्लारी बैल जोडी संत योगीराज चांगेश्वर महाराज यांच्या पालखी रथाला. असणाऱ्या किल्लारी बैल जोडीने यवत पंचक्रोशीतील नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या पारंपरिक बैल पोळा उत्सवाच्या निमित्ताने किल्लारी बैलांच्या मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने तात्यासाहेब दत्तात्रय मलभारे. अंकुश रामभाऊ दोरगे. बाळासाहेब चोभे भानुदास बधे. या हैशी छंद असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रित सहभाग घेतला होता.
खिल्लारी बैल जोडी पाळण्याचा या शेतकऱ्यांना पुर्वी पासुन छंद असल्याचे समस्त ग्रामस्थांच्या चर्चेतून बोलले जात होते. हौसेला मोल नाही. अशी पुर्वीची म्हण आहे. त्या प्रमाणे यवत येथील शेतकरी बाळासाहेब चोभे यांनी बैल पोळ्याच्या निमित्ताने ३ लाख २० हजार रुपये किमतीची किल्लारी बैल जोडी खरेदी केली असल्याचे त्यांनी सांगीतले. आपल्या किल्लारी बैल जोडीचा नाद करायचा नाय. असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. मिरवणूक दरम्यान फटाक्यांच्या धुम धडाक्यात पाटलांचा बैल गाडा. डी जे वर गाणं वाजवून मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये यवत पंचक्रोशीतील चोभे मळा, खैरे वस्ती. मलभारे वस्ती. दोरगे वाडी. रायकर मळा. अवचट वस्ती. या भागातील शेतकऱ्यांनी लहान मोठी बैल जोडींची गावातुन मिरवणूक काढण्यात आली होती. डी जे व फटाक्यांच्या आवाजाने पाटलांच्या बैलाने चौकात मुस मसु करत हुराळी घेत खळबळ उडवून दिली होती. चार युवकांचा एका बैलाने घाम काढला. मात्र पैठ्यांनी हातातील बैल सोडला नाही. या वेळी बाजार पेठेत एकच खळबळ उडाली होती. इतरांची मात्र धावपळ होती. यवत गावातील श्री काळभैरवनाथ मंदिर. महालक्ष्मी मंदिर. मारुती मंदिर. गणपती मंदिर. विठ्ठल रुक्माई मंदिर. येथे देव भेट करत खिल्लारी बैलांची मुख्य चौकातून मिरवणूक कढण्यात आली होती. या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील जानते व अनुभवी हैशी शेतकऱ्यांनी बैल पोळा उत्सवाच्या निमित्ताने आनंद व्यक्त केला.
वाचक क्रमांक :