यवत पोलीस स्टेशन येथे कंजार समाजाचा आक्रोश, ५० ते लाख रुपयांची होतेय मागणी. नाही तर गुन्हे दाखल करण्याची धमकी.. ज्वाला सिंगने घेतली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे. याची भेट.

By : Polticalface Team ,15-10-2023

यवत पोलीस स्टेशन येथे कंजार समाजाचा आक्रोश, ५० ते लाख रुपयांची होतेय मागणी. नाही तर गुन्हे दाखल करण्याची धमकी.. ज्वाला सिंगने घेतली पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे. याची भेट. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता. १६ ऑक्टोबर २०२३. दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथे पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे पिढीजात हातभट्टी दारू विक्रीत्यांचा समुह एकत्रित जमा झाला होता. या वेळी कंजार समाजातील महिलांनी यवत पोलीसांच्या विरुद्ध पोलखोल करुन आक्रोश व्यक्त करण्यात आला. शनिवार दि १४ ऑक्टोबर २०२३ रोजी यवत पोलीस स्टेशन समोर कंजार समाजातील पुरुष महिलांनी घनाघाती आरोप केले आहेत. गेली दोन वर्षा पासून यवत पोलीस स्टेशन येथील काही पोलीसांनी अवैध हातभट्टी दारू विक्री व्यावसाय करणाऱ्या कंजार समाजातील लोकांन विरुद्ध कारवाई ची मोहिम सुरू केली होती. छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या कंजार समाजावर पोलीसांन कडुन अंन्याय होत आहे. ५० ते लाख रुपयांची मागणी केली जात आहे.तशी तजबीज न झाल्यास. कंजार समाजातील पुरुष महिला व मुलांनवरती. महाराष्ट्र दारुबंदी कायदा क.६५ (ख) (ग) (च) कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले. दौंड तालुका पच्छिम भागातील. देवकर वाडी. केडगाव.२२ फाटा. हिंगणीगाडा. पिलानवाडी. खामगाव. वाखारी खोर भांडगाव कासुर्डी भरतगाव. ता दौंड जिल्हा पुणे येथील कंजार समाजातील लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मार्च महिन्यात मृत्यू झालेल्या देवानंद मुकारम नानावत याचे आरोपींच्या यादीत नाव असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. मार्च महिन्यात केडगाव २२ फाटा येथे पोलिसांनी छापेमारी केली त्यावेळी पोलिसांच्या भितीने देवानंद पळुन जात असताना टेम्पोचा अपघात झाला. त्यामध्ये देवानंद मुकारम नानावत याचा मृत्यू झाला होता. हाताशी आलेला तरुण मुलगा जीवाशी गेला. मुलाच्या मृत्यू नंतर काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचा पण धास्तीने मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्व कुटुबाची वाताहात झाली. अशी माहिती उपस्थित कंजार समाजातील पुरुष महिलांनी दिली. तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीत हे साहेब आल्या पासून. सर्व अवैद्य धंन्दे जोमाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. आम्हाला पोट भरणे मुश्किल झाले असून. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यवत भांडगाव चौफुला केडगाव पाटस राहु. या परीसरात बेकायदेशीर अवैध धंदे कल्याण मटका बाजार, मेन मुंबई बाजार सोरट संट्टा जुगार. तसेच महामार्गावरील हॉटेल ढाब्यानवर देशी विदेशी व हातभट्टी दारू विक्री होत नाही काय ? असा सवाल उपस्थित करुन पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का ? केले जात आहे.कंजार समाजातील लोकांची पिळवणूक केली जात असल्याची प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी व्यक्त करुन पोलीस प्रशासनाच्या कर्तव्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. हि मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील वसुली पथक जोरदार कामगीरी बजवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यवत पोलिसांनी या भागातील अवैद्य धंदेवाल्यांवर कोणती कारवाई केली आहे काय. असा थेट सवाल कंजार समाजातील पुरुष महिलांनी उपस्थित केला आहे. यवत पोलीस स्टेशन येथे पंचक्रोशीतील कंजार समाजातील जनसमुदाय मोठ्या संख्येने एकत्रित जमा झाला होता. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून प्रशासनालाच धारेवर धरण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासना समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दौंड तालुका पच्छिम भागातील कंजार समाजाचे प्रख्यात असलेले. ज्वाला सिंग यांनी यवत पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची भेट घेतली. समाजावर होणा-या अन्याया अत्याचार विरुद्ध बोलताना ते म्हणाले आमचा पिढीजात हातभट्टी दारू तयार व विक्री करण्याचा व्यवसाय आम्ही बंद करतो. आमच्या समाजातील कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीता शासनाने उपाय योजना कराव्यात. जमीन उद्योग धंदे उपलब्ध करून जगण्याचे साधन निर्माण करावे. असे मत ज्वाला सिंग यांनी व्यक्त केले. या वेळी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व कंजार समाजातील महिला पुरुष व मुला बाळासह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. या वेळी दामू बारोट्या नानावत संदेश अर्जुन नानावत आकाश गोविंद अर्जुन नानावत सागर गोविंदा नानावत अक्षय विठ्ठल नानावत पवन लालू नानावत अंतरा रमेश गुडदावत विश्वात्मा मनावत. आदी महिला बाळ गोपाळांचा मेळाव्यात समावेश झाला होता. यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे संबंधित पोलिसांन विरुद्ध कारवाई करतील काय ? असा प्रश्न उपस्थित नागरिकांमध्ये केला जात आहे. तसेच यवत येथिल वाढती दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद विवाद उफाळून येऊ लागले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे तत्काळ बंद करण्या बाबत परीसरातील समस्त ग्रामस्थांमध्ये चर्चा होत असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष