व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यवत शाखा लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन.सद्गुरू सुमंतबापुजी हंबीर महाराज यांच्या शुभहस्ते.
By : Polticalface Team ,17-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १६ ऑक्टोबर २०२३. दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथे व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. यांचे यवत शाखा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवार दि,१८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर प.पु.सद्गुरू श्री सुमंतबापुजी हंबीर महाराज.अध्यक्ष विश्वव्यापी मानवधर्म आश्रम पाटेठाण ता.दौंड जिल्हा पुणे. यांच्या शुभहस्ते यवत शाखा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी दौंड तालुका ग्रामीण भागातील मौजे यवत पंचक्रोशीतील शेतकरी बांधव सभासद सामाजिक राजकीय व्यापारी वैद्यकीय शैक्षणिक बँकिंग पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रातील विविध मान्यवर मित्र परिवार आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या यवत शाखा लोकार्पण सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चे चेअरमन संचालक कर्मचारी वृंद यांच्या वतीने. स्थानिक मान्यवरांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे सोलापूर महामार्गावरील मौजे
यवत ता दौंड जिल्हा पुणे. येथिल महाराष्ट्र बँकेच्या जवळ. महालक्ष्मी नगर. या ठिकाणी यवत शाखा सुरू होत आहे. हि अतिशय चांगली बाब असल्याचे बोलले जात आहे. यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात विस्तार झाला असुन कार्यरत आहे.
दौंड तालुक्यातील शेतकरी व्यापारी व नवनिर्वाचित उद्योजकांसाठी महत्वपूर्ण ठरणार असुन दौंड तालुका ग्रामीण व पंचक्रोशीतील शेतकरी व्यापारी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील तसेच उद्योजक बांधवांना
हि यवत शाखा फायद्याची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ची यवत शाखा. सुरू करण्या बाबत अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांची मागणी होती. त्या अनुषंगाने सभासदांच्या आणि नागरीकांच्या मागणी नुसार. यवत शाखेचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम होत असल्याने. दौंड तालुका व यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी
सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रिडिट सोसायटी लिमिटेड.चे मा.चेअरमन संचालक कर्मचारी वृंद यांनी व्यक्त केली आहे.
वाचक क्रमांक :