नवरात्र दसरा महोत्सवाच्या निमित्ताने श्री काळभैरवनाथांची पालखीचा. हजरत बडेशावली बाबा दर्गा येथे विसावा. यवत ग्रामस्थांनी सोने (आपटा) लुटण्याचा घेतला आनंद,
By : Polticalface Team ,25-10-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २५ ऑक्टोबर २०२३. दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील. सार्वजनिक दसरा महोउत्सवाची सर्वत्र चर्चा आहे. तसेच अशोका विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून देशात साजरा केला जातो. नागपूर दीक्षाभूमी येथे.१९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच लाख अनुयायींनी सह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. सम्राट अशोकाच्या जंबूदीपाचे साम्राज्य पूर्वकालीन इतिहासाची साक्ष देत आहे.
दौंड तालुक्यातील मौजे यवत येथे
हिन्दू- मुस्लिम दोन समाजातील एकोप्याचे प्रतिक दसरा महोउत्स ठरत असल्याचे पाहवयास मिळते. यवत येथील श्री काळभैरवनाथांची पालखी गाव प्रदक्षिणा दरम्यान पारंपरिक संबळ वाद्य पथकाच्या तालावर (अश्व घोड्याचे ) कला प्रदर्शनाने नागरीकांचे लक्ष वेधले होते.
नवरात्र दसरा महोत्सवाच्या निमित्ताने बाजार पेठेतील नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून आली. प्रामुख्याने फुल मार्केट मोठ्या प्रमाणावर गजबजले होते. विविध फुलांचा सुगंध बाजार पेठेतील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.
फुल विक्री करणाऱ्यांची संख्या अधिक होती. १० रुपयात दोन किलो फुलांचा बाजार ढासळल्याने व्यापाऱ्यांना अधिक नुकसान सहन करावे लागले असल्याने विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. विविध फुलांचा ढिग तसाच ठेवून फुल विक्री व्यापारी निघून गेले. पुणे सोलापूर महामार्गाच्या आजूबाजूला शेतकऱ्यांनी फुलांच्या भरलेल्या गाड्यातील फुलं खाली फेकुन दिले असल्याचे दिसून येत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
यवत पंचक्रोशीतील नागरीकांनी दसऱ्याच्या निमित्ताने सिलांगण खेळण्यासाठी. मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती.
श्री काळभैरवनाथाची पालखी खांद्यावर घेऊन. हजरत बडेशावली बाबा दर्गा येथे विसावा घेतला जातो. या दरम्यान पुजा आरती करून (आपटा) सोने लुटण्याचा पारंपरिक धार्मिक कार्यक्रम.मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही परंपरा पुर्वी पासुन प्रख्यात असुन यवत येथील नागरिकांनी कायम जपली असल्याचे दिसून येत आहे. यवत येथील हिन्दू- मुस्लिम दोन समाजातील एकोप्याचे प्रतिक म्हणून दसरा महोत्सवाच्या निमित्ताने (आपटा) सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम प्रेरणादायी ठरत आहे. सार्वजनिक दशरा महोउत्सवाची परंपरा यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी कायम जपली असल्याचे बोलले जात आहे. या पारंपरिक महोत्सवाच्या कार्यक्रमात. पुणे सोलापूर महामार्गावरील दोन्ही बाजूच्या बंदीस्त लोखंडी ब्रॅकेट वरुन उड्या मारत पार करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हायवेवरील गाड्यांची वाहतूक पाहता दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी यवत पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस कर्मचारी गैरहजर असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चौकट.
(श्री काळभैरवनाथ मंदिर. महालक्ष्मी मंदिर. बडेशावली बाबा दर्गा. हि धार्मिक स्थळे यवत ग्रामस्थांची कुळदैवत आहेत. हिन्दु- मुस्लिम समाजातील नागरीकांना पारंपरिक धार्मिक कार्यक्रम प्रसंगी पुणे सोलापूर महामार्गावरील दोन्ही बाजूच्या लोखंडी ब्रॅकेट वरुन देवाची पालखी घेऊन जावे लागते. हि मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी उड्डाण पूल होणे आवश्यक आहे. अनेक वर्षापासून नागरिकांचा उड्या मारण्याचा कार्यक्रम सुरू आहे. महिलांची प्रवास दरम्यान अतिशय गैरसोय होत आहे. दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांनी तत्काळ दखल घेऊन यवत येथील महामार्गावरील उड्डाण पूलाचे काम तातडीने मार्गी लावावे. तसेच यवत येथे भव्य सभागृह होणे काळाची गरज आहे. यवत येथील नागरिकांकडून सार्वजनिक कामांची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. आता आश्वासन नको. कृती दाखवण्याची आवश्यकता आहे. असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे )
वाचक क्रमांक :