यवत येथील तृतीयपंथी दिपा गुरु रंजीता नायक. यांनी दिल्या दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा. जगदंबा सर्वांना उदंड आयुष्य देवो.
By : Polticalface Team ,13-11-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १३ नोव्हेंबर २०२३. दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील तृतीयपंथी दिपा गुरु रंजीता नायक. (नानी) यांच्या मार्गदर्शनाखाली यवत बाजार पेठेतील व्यापारी उद्योजक दुकानदार यांची भेट घेऊन. तृतीयपंथींनी दिपा गुरु रंजीता नायक यांनी पारंपारिक ढोल वाद्यांच्या तालावर गाणी गाऊन. दिवाळी सनाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ उद्योजक व्यापारी नागरिकांना दिल्या शुभेच्छा. या प्रसंगी दिपा गुरु रंजीता नायक. गौरी. आचल. ममता. आदी तृतीयपंथी यांचा प्रामुख्याने समावेश होता.
यवत गावातील सकल व्यापारी दुकानदार उद्योजकांकडे फेरी काढण्यात आली होती. या दरम्यान उपस्थित तृतीयपंथींनी उत्साहात गाणी गायली. पारंपारिक ढोल वाद्याच्या गजरात उद्योजक व्यापारी बांधवांच्या सुख समृद्धी व उदंड आयुष्य मिळावे. तसेच उद्योग व्यवसायात धन दौलत मिळावी. बळीराजा सुखी होऊदे. दुष्काळाचं सावट नाहिसे होऊदे. येणारं नवीन वर्ष सुखाचे व समृद्धीचे जाऊ द्यावे अशी आई जगदंबेकडे प्रार्थना करण्यात आली. तसेच सर्वांचे आरोग्य सुखात रहो. अशी प्रतिक्रिया यवत येथील तृतीयपंथी दीपा गुरु रंजीता नायक (नानी) यांनी दिपावलीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील उद्योजक व्यापारी भिंसेंन शेठ जैन. दिनेश भाऊ जैन.यांनी तृतीयपंथी दिपा नानी. व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. शाल श्रीफळ तसेच दिवाळीच्या निमित्ताने आर्थिक मानधन देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी यवत येथील उद्योजक व्यापारी दुकानदार व नागरिकांचे लक्ष वेधले होते
या प्रसंगी बोलताना म्हणाले दर वर्षी प्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने यवत गावातील सर्व उद्योजक व्यापारी दुकानदार यांच्या भेटीला आम्ही येत असतो. दौंड तालुक्यातील व मौजे यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहात दिपावली साजरी केली. दौंड तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदअधिकारी तसेच कार्यकर्ते नेहमी मोठ्या मनाने सहकार्य करत असतात.
वर्षातुन एकदा गाव फेरी करुन. सुख समृद्धी आरोग्यासाठी जगदंबा सर्वांना उदंड आयुष्य व सुखात ठेव. अशी प्रतिक्रिया दिपा गुरु रंजीता नायक यांनी व्यक्त करुन दिपावलीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
वाचक क्रमांक :