राज्यात सरसकट मराठा कुणबी आरक्षणाचा लढा. दौंड तालुक्यातील मौजे वरवंड येथे मनोज जरांगे पाटिल यांच्या उपस्थितीत दि.१६ नोव्हेंबर रोजी जाहीर विराट सभा.
By : Polticalface Team ,14-11-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १४ नोव्हेंबर २०२३. दौंड तालुक्यात मराठा कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावर वादळ निर्माण होणार. असल्याची चर्चा होऊ लागली आहे. राज्यात सरसकट मराठा कुणबी आरक्षणाचा लढा जोर धरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर दि १२ नोव्हेंबर रोजी वरवंड येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
दौंड तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील लाखो मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे या बैठकीत संकेत दिले आहेत. गुरुवार दि १६ नोव्हेंबर २०२३ रोजी मौजे वरवंड ता दौंड जिल्हा पुणे. येथे मनोज जरांगे पाटिल यांच्या उपस्थितीत जाहीर विराट सभेचे आयोजन स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आले असल्याचे दौंड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मराठा कुणबी आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटिल यांची जाहीर सभा होणार असल्याने पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था तसेच पार्कींग व्यवस्था संदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित करुन उपस्थित आयोजकांचे लक्ष वेधले होते. मात्र सभेच्या निमित्ताने आलेल्या नागरिकांनी नियोजित वाहन पार्कींग मध्ये वाहन पार्कींग करण्याचे आवाहन केले आहे. जेने करुन समाज बांधवांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी.
मौजे वरवंड येथे होणार असल्याने या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली असुन. सदर सभेच्या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील मराठा कुणबी समाज लाखोंच्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. वरवंड येथील बाजार मैदानात या सभेचे नियोजन करण्यात आले असून. आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा कुणबी आरक्षण संघर्ष मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटिल हे करमळा. टेंभुर्णी. कुरकुंभ. दौंड. पाटस या मार्गाने मौजे वरवंड येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :