राज्यघटनेच्या साक्षीने व महापुरुषांच्या आशिर्वादाने पार पडला आगळा वेगळा मंगल परिणय लग्न सोहळा.!

By : Polticalface Team ,22-11-2023

राज्यघटनेच्या साक्षीने व महापुरुषांच्या आशिर्वादाने पार पडला आगळा वेगळा मंगल परिणय लग्न सोहळा.!
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता.२२ नोव्हेंबर २०२३ चित्रपट क्षेत्रातील अभिनेते दिग्दर्शक एलचंद्रा उर्फ चंद्रकांत लोंढे यांची कन्या प्रज्ञा हिचा मंगल परिणय (विवाह) शनिवार (ता.११) रोजी मोठ्या थाटात व अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. या वेळी मंगल परिणय स्थळी मंडपाच्या प्रत्येक खांबावर जनहितार्थ व प्रेरणादायी संकल्पना देण्यात आली होती. त्यामध्ये विज वाचवा, पाणी वाचवा, स्त्री पुरुष समानता, मुलगी वाचवा मुलगी शिकवा स्त्री भ्रूण हत्या, झाडे लावा झाडे जगवा, असे सामाजिक संदेश देणारे बॅनर लावून वऱ्हाडी मंडळीचे व मान्यवरांचे लक्ष वेधून घेत होते. (नववधू) उपासिका प्रज्ञा हिच्या मंगल परिणयाच्या अगोदर खिल्लारी बैलांना झुली घालून पारंपरिक हलगीच्या वाद्यांत, उपासिकेच्या हातात (संविधान) राज्य घटनेची प्रत घेऊन बैलगाडीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली होती.
या मंगल परीणयाच्या प्रसंगी अचानक व्यासपीठावर महापुरुषांच्या भुमिकेत स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, विद्येची देवता. शिक्षणाचे जनक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, निळोपंत व मावळे, बौद्ध धम्म प्रचारक भंतेजी यांचे मंगल परिणयाच्या स्थळी आगमन होताच, उपासक उपासिकांनी महापुरुषांचे आशिर्वाद घेताच. बौद्धाचार्य श्रीकृष्ण मोरे यांनी सदर मंगल परिणयास सुरुवात केली, या सर्व महापुरुषांच्या भुमिकेत असलेल्या महामातांनी नव वधुवरांना हाताने इशारा करुन आज्ञा केली, मंचकावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीसमोर ठेवलेली भारतीय राज्यघटना हातात घेऊन उपासिका प्रज्ञा लोंढे व उपासक प्रेमराज भालेराव या नववधूंना नांदा सौख्य भरे असा आशिर्वाद देण्यात आला, या आगळ्यावेगळ्या मंगल परिणयाची बारामती तालुका व कारखेल गाव पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे. या मंगल परिणयाचे विधीकार, बौद्धाचार्य श्रीकृष्ण मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले होते.
या मंगल परिणयाच्या निमित्ताने फुले शाहू आंबेडकर चळवळीतील प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती तसेच सामाजिक शैक्षणिक राजकीय कला क्रीडा व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मंगल परिणय यशस्वी करण्यासाठी गावातील युवा तरुण व जेष्ठ मंडळींनी मोलाची भुमिका दर्शवली असल्याचे वधु पिता यांनी सांगितले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष