दौंड शहर व तालुक्यातील बेकायदेशीर दारु मटका जुगार वेश्या व्यवसाय धारकांवर तत्काळ गुन्हे दाखल करुन, अवैध धंदे बंद करा. रिपाइं जिल्हा संघटक भारत सरोदे. यांचा आंदोलनाचा इशारा.
By : Polticalface Team ,23-11-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २३ नोव्हेंबर २०२३ दौंड शहर व तालुक्यातील बेकायदेशीर दारु मटका जुगार वेश्या व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. मात्र दौंड पोलीस प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.? ही मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा संघटक भारत सरोदे यांनी व्यक्त केले.
कायद्याचा धाक दाखवून शहरातील दुचाकी वाहनांवर कारवाई केली जात आहे, दौंड पोलीसांनी बेकायदेशीर दारु मटका जुगार वेश्या व्यवसाय धारकांवर तत्काळ गुन्हे दाखल करून अवैध धंदे तत्काळ बंद करावेत. अंन्यथा रिपाइं व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने दि.२७/११/२०२३ रोजी दौंड पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वतीने दि.२१/११/२०२३ रोजी दौंड पोलीस स्टेशन. मा पोलीस अधीक्षक पुणे जिल्हा ग्रामीण. तहसिलदार कार्यालय दौंड. मा विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय दौंड. यांना निवेदन देण्यात आले असल्याचे भारत सरोदे यांनी सांगितले. या प्रसंगी दौंड शहरातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते नागशेन जी धेंडे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा संघटक भारत जी सरोदे. दौड शहर युवक अध्यक्ष अमित जी सोनवणे.अदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या निवेदनावर स्वाक्षरी असल्याचे दिसून येत आहेत.
दौंड शहर व तालुका ग्रामीण भागात बेकायदेशीर अवैध देशी विदेशी हातभट्टी दारू विक्री मटका जुगार तसेच वेश्या व्यवसाय खुलेआम राजरोसपणे सुरू आहेत. या बेकायदेशीर अवैध व्यवसायाकडे
दौंड विभागीय पोलीस अधिकारी यांची डोळेझाक करण्याचे नेमके कारण तरी काय.? असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. दौंड तालुक्यातील अवैध व्यवसाय धारकांची मोठी दहशत असल्याचे बोलले जात असुन राजकीय क्षेत्रातील बड्या नेत्यांचा अवैध व्यवसाय धारकांच्या डोक्यावर अदृश्य वरदहस्त असल्याने पोलिस प्रशासन हातबल झाले असल्याची दौंड शहर व तालुक्यात चर्चा होत आहे.
दौंड शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या दुचाकी वाहनांनवर कारवाई करण्यासाठी दौंड पोलीस कर्मचारी कायद्याचा धाक दाखवून दुचाकी वाहनांची चावी ताब्यात घेऊन वाहन पोलीस स्टेशन येथे घेऊन जातात. व नागरीकांना वाहन सोडवण्यासाठी न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात येतो. पोलीस प्रशासन किती कर्तव्यदक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पोलीस कर्मचारी करीत आहेत.
पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य विसरून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याचे बोलले जात आहे.
दौंड पोलीस प्रशासनच कायद्याची पायमल्ली करत आहे. ही मोठी शोकांतिका असल्याची दौंड तालुक्यात चर्चा आहे.
दौंड शहर व तालुक्यातील
कुरकुंभ. पाटस. चौफुला. केडगाव. भांडगाव. यवत. या ग्रामीण भागातील तसेच पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल ढाब्यांवरील लॉजिंग वेश्या व्यवसाय. तसेच भिमा नदीतील बेकायदेशीर गौण खनिज वाळू उपसा पोयटा माती मुरुम उत्खनन करुन विक्री करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या चार चाकी जीसीबी ट्रॅक्टर ट्रक हायवा वाहने रात्रंदिवस जोरदार वाहतूक सुरू आहेत, मात्र दौंड पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना डोळे असुन दिसत नाही. हे दुर्दैव असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा संघटक भारत सरोदे यांनी सांगितले. दौंड पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयातील अधिकारी यांचे अवैध धंदे व बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात गौण खनिज उत्खनन माफीयांवर पोलीस प्रशासन व महसूल विभागातील मंडल अधिकारी आणि गाव कामगार तलाठी यांच्याकडून कुठलीच कारवाई केली जात नाही अवैध व्यवसाय धारकांवर तत्काळ गुन्हे दाखल करून अवैध धंदे बंद करावेत अंन्यथा दौंड पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा संघटक भारत सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दौंड विभागीय पोलीस अधिकारी व दौंड तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :