दौंड तालुक्यातील मौजे यवत येथे २६ नोव्हेंबर संविधान संन्मान दिनाच्या निमित्ताने. सरपंच समीर दोरगे यांनी दिल्या बहुजनांना शुभेच्छा.

By : Polticalface Team ,27-11-2023

दौंड तालुक्यातील मौजे यवत येथे २६ नोव्हेंबर संविधान संन्मान दिनाच्या निमित्ताने. सरपंच समीर दोरगे यांनी दिल्या बहुजनांना शुभेच्छा. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २६ नोव्हेंबर २०२३ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे. संविधान विचार मंच. यवत. येथील डॉ संतोष बडेकर. अनिल गायकवाड. दत्ताभाऊ डाडर. यांच्या मार्गदर्शनाखाली. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी. संविधान संन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यवत गावचे विद्यमान सरपंच व या कार्यक्रमाचे अध्यक्ष समीर दोरगे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील प्रमुख मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वतंत्र भारताचे संविधान व राज्य घटनेने दिलेले नागरिकांना मुलभूत अधिकार. सार्वभौम समाजवादी. धर्मनिरपेक्ष लोकशाही. न्याय. स्वातंत्र्य. समानता. आणि बंधुता. या मुलभूत तत्वावर गेली ७४ वर्षापासून अखंड भारत देश कार्यरत आहे.
देशातील विविध जाती धर्म प्रवर्गातील नागरिकांना समानता व प्रतिष्ठा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य. निश्चितपणे भारतीय राज्य घटनेने प्राप्त करून दिला असल्याचे कासुर्डी गावचे वि का सो.माजी चेअरमन उत्तमराव सोनवणे.यांनी सांगितले.
यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच नाथदेव (आबा) दोरगे. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर. सतिश सावंत सर. हभप दिपक महाराज मोटे. उद्योजक रमेश शेठ जैन. कमरुद्दीनभाई तांबोळी. कैलास आबा दोरगे. टिळेकर भाऊसाहेब. सौ.सारिका ताई भुजबळ. यांनी २६ नोव्हेंबर संविधान संन्मान दिनाच्या निमित्ताने बहुजन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
पूर्वकालीन इतिहास पाहता राणीच्या उदरातून युवराज जन्माला येत असे. आणि कालांतराने तोच राजा होत ही पुर्वकालीन वेवस्था संविधानाच्या माध्यमातून संपुष्टात आली. व सर्वसामान्य व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली. आदीलशाही. मोगलशाही. बादशाही. कालखंडा नंतर ब्रिटिशांच्या १५० वर्षाच्या हुकुमशाहीला खऱ्या अर्थाने सुरुंग लावला.१९३२ साली इंग्लंड मध्ये पहिली गोलमेज परिषद डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चांगलीच गाजवली होती. त्या नंतर भारत स्वतंत्र्याच्या कालखंडात अनेक घडामोडी घडल्या. स्वातंत्र्याचा लढा दिवसान दिवस जोमाने तेवत होता . ब्रिटिशांनी पुढील भविष्य ओळखले जाते. स्वातंत्र्य भारताची घटना कशी असेल. असा प्रश्न उपस्थित केला. भारत देश कसा चालवणार ? भारताची राज्यघटना आता तुम्हीच तयार करा.? या संदर्भात ९ डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्ली येथील सभागृहात पहिली मिटिंग घेण्यात आली. डॉ सच्चिदानंद सिन्हा यांची प्रभारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्ष पदी. निवड करण्यात आली. पंडीत नेहरू यांनी पहिला ठराव मांडला. त्यामध्ये एकुण ८ कलम होते. सामाजिक आर्थिक. राजकीय. न्याय. दर्जा. संधी विचार. कायद्या समोर समानता. ६ व्या कलमात अल्पसंख्याकांना व मागासवर्गीय यांना पुरेशी सुरक्षितता या संदर्भात चर्चा सुरू करण्यात आली. या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर बोलताना म्हणाले. प्रस्तुत ठरावत हक्क नमूद करण्यात आले आहे परंतु उपाय सुचवले नाहीत. अंमलबजावणीचे मार्ग असल्याशिवाय हक्कांना काहीच अर्थ नाही. हक्कांची पायमल्ली झाली तर हे उपायच त्यांच्या पुनस्थापनेसाठी सहाय्य करतात तेच वगळले आहे. कायद्याच्या प्रक्रिये शिवाय जीवीत हानी. स्वातंत्र्य व मालमत्ता हिरावून घेतली जाणार नाही. या सर्वसामान्य तत्वांचाही यामध्ये उल्लेख नाही. कायदा व नैतिकतेच्या आधिन राहुन मुलभूत हक्क दिले पाहिजेत. कायदा म्हणजे काय नैतिकता म्हणजे काय ते विद्यमान सरकारने ठरवावे. राज्यकर्त्यांनी नाही. विधि मंडळ. कार्यकारी मंडळ. न्याय मंडळ. हे शासन यंत्रणेची अंगे तयार करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.
१७ डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्ली सभागृहातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण अत्यंत प्रभावी ठरले. ३० ऑगस्ट १९४७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. २ वर्ष ११ महिने १७ दिवसांत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३९५ अनुछेद ८ अनुसुची करुन संविधान तयार झाले.१६५ दिवसांत ११ अधिवेशने झाली.११४ दिवस समितीने घटनेच्या मसुद्यावर विचार विनिमय करण्यात आला. या प्रसंगी (७६३५) दुरुस्त्या करण्यात आल्या व (२४७३) प्रत्येक्षात प्रश्न सोडविण्यात आले. असल्याचे घटना समितीच्या शेवटच्या भाषणात बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. इतर देशांच्या घटना पाहिल्या तर त्या पेक्षा भारतीय राज्य घटनेतील मुलभूत अधिकार नागरिकांना बहाल केले आहेत. (अमेरिकेच्या घटने मध्ये २१ अनुछेद व ४ अनुसुची आहेत.) (कॅनडाच्या घटने मध्ये १४७ अनुछेद २+५ अनुसुची आहेत) (ऑस्ट्रेलिया घटने मध्ये २८ अनुछेद ९ अनुसुची आहेत.) आफ्रिका घटने मध्ये १५३ अनुछेद व १ अनुसुची आहे. भारतीय राज्य घटना या मध्ये ३९५ अनुछेद व ८ अनुसुची आहेत. शिवाय लोकशाही न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. सर बी एन राव. सर आल्लादी. कृष्णा स्वामी. अय्यर. अधिक दोन असे सात मसुदा समितीमध्ये सदस्य होते. भारतीय राज्य घटनेच्या अधिन राहुन गेली ७४ वर्षापासून अखंड भारत देश वाटचाल करीत असल्याचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितले. यवत पंचक्रोशीतील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील तसेच सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नाथदेव दोरगे. जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम. अँड प्रकाश सोळंकी. उद्योजक रमेश शेठ जैन. कैलास आबा दोरगे. टिळेकर भाऊसाहेब. कमरुद्दीन भाई तांबोळी. मंगेश रायकर. भारत भुजबळ. काळुराम शेंडगे बाळु मोरे चंद्रकांत गायकवाड. सारिका ताई भुजबळ. बाईजाबाई पवार. तसेच यवत ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी महिला वर्ग तसेच पंचक्रोशीतील व्यापारी दुकानदार मित्र परिवार उपस्थित होते. २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील ताज हॉटेल येथे झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यात शहीद झालेल्या शहिद जवान विरांना भावपूर्ण आदरांजली देण्यात आली. उपस्थित नागरिकांना संविधानातील उद्देशिका वाचन करुन संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संतोष बडेकर यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार अनिल गायकवाड यांनी व्यक्त केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष