श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहास प्रारंभ, यवत नगरी राम कृष्ण हरिनामाने दुमदुमली.

By : Polticalface Team ,30-11-2023

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहास प्रारंभ, यवत नगरी राम कृष्ण हरिनामाने दुमदुमली. 
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ३० नोव्हेंबर २०२३ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला आहे.दरवर्षी प्रमाणे कालाष्टमीनिमित्त श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. दि.२९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले असून, सप्ताहाच्या पहिल्या दिवशी समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने कलश, ज्ञानेश्वरी ग्रंथ. विना पूजन करून प्रारंभ करण्यात आला, दुपारी ह.भ.प धनवटे महाराज (भांडगाव) यांचे प्रवचन तर रात्री ह.भ.प श्यामसुंदर महाराज ढवळे (हिंगणीबेर्डी) यांच्या उत्कृष्ट पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाने यवत पंचक्रोशीतील भाविक वैष्णव भाराऊन गेले होते. श्री काळभैरवनाथ जन्मोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या मधुर सुरांनी यवत नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून हरिनाम कीर्तनाने यवत नगरी दुमदुमली आहे.
जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यामध्ये रोज काकड आरती, महापूजा अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरीजागर यासह दि.३० रोजी सायं. ५ वा ह.भ.प रविकाका अत्रे यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प पोपट महाराज पाटील (कासार खेडेकर, खानदेश) यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न होणार आहे.
तसेच दि. १ डिसेंबर रोजी ह.भ.प उत्तम महाराज ढवळे (वडगाव रासाई) यांचे प्रवचन तर ह.भ.प आदिनाथ महाराज लाड (आळंदी) यांचे कीर्तन, दि.२ रोजी ह.भ.प नाना महाराज शितोळे (पाटस) यांचे प्रवचन तर ह.भ.प सुधाकर महाराज वाघ (पैठण) यांचे कीर्तन, दि. ३ रोजी ह.भ.प सुमंत महाराज हंबीर (पाटेठाण) यांचे प्रवचन तर ह.भ. प वैजनाथ महाराज थोरात (हिंगोली) यांचे कीर्तन, दि. ४ रोजी ह.भ.प सदाशिव महाराज कामठे (फुरसुंगी) यांचे प्रवचन तर ह.भ.प गंगाराम महाराज राऊत (पैठण) यांचे कीर्तन , मंगळवार दि.५ रोजी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी भव्य दिंडी सोहळा व ह.भ.प माधव महाराज राऊत (बीड) यांचे कीर्तन तर रात्री नाथांचा गोंधळ होईल, बुधवार दि.६ डिसेंबर रोजी सकाळी ह.भ.प प्रकाश महाराज साठे (बीड- धारूर) यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहाच्या काळात रोज रात्री अनुक्रमे वेळेत श्री विठ्ठल समाज भजनी मंडळ यवत, डॉ.बंगला व भोसलेवाडी भजनी मंडळ, सौंदडवाडी व उंडवडी भजनी मंडळ, भरतगाव, कासुर्डी भजनी मंडळ, कामटवाडी भजनी मंडळ, लडकतवाडी, पोंढे भजनी मंडळ यांचे हरीजागर होईल.
कीर्तनासाठी गायनाचार्य ह.भ.प प्रकाश महाराज घुले (परभणी), ह.भ.प नानासो शितोळे महाराज (पाटस), ह.भ.प विष्णुपंत पांढरे, ह.भ.प विनोद महाराज झेंडे (पाटस), ह.भ.प उत्तम ढवळे महाराज (वडगाव रासाई), ह.भ.प बाळासाहेब टेमगिरे महाराज (भरतगाव) मृदंगाचार्य ह.भ.प विजय महाराज धर्माधिकारी (माळशिरस) ह.भ.प वैभव महाराज गायकवाड (कासुर्डी) ह.भ.प गुणाजी महाराज फुले (आळंदी) यांसह विठ्ठल समाज भजनी मंडळ हे साथ-संगीत करणार असून ह.भ प शंकर महाराज उंडे (आळंदी) हे व्यासपीठ चालक असणार आहेत सप्ताह काळात रोज दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले असून यवत व यवत परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री काळभैरवनाथ देवस्थान व इतर देवस्थान ट्रस्ट विठ्ठल समाज भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळ यवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष