व्यंकटेश मल्टीस्टेट ने दिले विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाचे धडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली बँकिंग क्षेत्राची माहिती..

By : Polticalface Team ,19-12-2023

व्यंकटेश मल्टीस्टेट ने दिले विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाचे धडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली बँकिंग क्षेत्राची माहिती..   दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता १९ डिसेंबर २०२३. दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र २ चे विद्यार्थी मुला मुलींना बँकेतील कामकाजा बाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. हा आगळा वेगळा उपक्रम मंगळवार दि १९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:३०.वाजता यवत येथील शाखेत आयोजित करण्यात आला होता.
मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील व्यंकटेश मल्टीस्टेटचे विभागीय अधिकारी मा प्रवीण यादव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत यवत शाखेचे शाखा व्यवस्थापक मा.मयूर कुंभार सर. यांनी व्यंकटेश मल्टीस्टेट च्या कामकाजा बाबत यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी मुला मुलींना माहिती दिली.
ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींना शिक्षण घेत असताना त्यांना बँकेच्या व्यवहाराचे ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने यवत येथील व्यंकटेश मल्टीस्टेट चे शाखा व्यवस्थापक मयूर कुंभार सर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व मुला मुलींना शाखेत भेट देण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मा उज्वला रंधवे मॅडम व सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या मुला मुलींना घेऊन यवत येथील व्यंकटेश मल्टीस्टेट मध्ये भेट दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देत. बँकेतच बँक व्यवहाराचे धडे देण्यात आले.
या प्रसंगी शाखा व्यवस्थापक, कॅशियर यांचे काम कशा पद्धतीने केले जाते तसेच बँकेतील व्यवहाराचे ज्ञान देऊन बचत खाते उघडण्याचा फॉर्म कसा भरावा. रक्कम भरणा स्लिप कोणती असते. विड्रॉल स्लिप कोणती असते. चेक कसा भरावा. तसेच बँकेतील लॉकर ,तिजोरी प्रत्यक्ष दाखवून माहिती देण्यात आली. यवत येथील व्यंकटेश मल्टीस्टेट यवत शाखेच्या व्यवस्थापकांनी हा उपक्रम सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात बँकिंग व्यवहारातील आर्थिक ज्ञान असणे काळाची गरज आहे. अशी प्रतिक्रिया डिव्हिजन मॅनेजर प्रवीण यादव सर यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले. या अभियानामुळे भारतातील युवा तरुण पिढी ही सुजाण व सुसंस्कृत व्हावी. लहानपणा पासूनच शालेय जीवनात असताना आर्थिक बचतीचे महत्व समजल्यास सुजाण नागरिक व पैशाचे महत्त्व समजणारी युवा तरुण पिढी निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.२ चे मुख्याध्यापक. एम एम सिंगे सर.शिक्षिका मा.उज्वला राजेंद्र रंधवे मॅडम उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींना आज काही वेगळे शिकण्याची संधी व्यंकटेश मल्टीस्टेट च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली त्या त्याबद्दल यवत येथील मुला मुलींच्या पालकांनी व उपस्थित नागरिकांनी व्यंकटेश मल्टीस्टेट चे विभागीय अधिकारी प्रवीण यादव सर. व शाखा व्यवस्थापक मयुर कुंभार सर यांचे आभार व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र २ चे इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी मुला मुलींना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेच्या वतीने नविन वर्षातील वार्षिक कॅलेंडर भेट देण्यात आले. या वेळी यवत व पंचक्रोशीतील उंडवडी भोसले वाडी येथील गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष. दिनेश गडदे. चोभे मळा येथिल अजीत फुले. पत्रकार अनिल गायकवाड. उपस्थित होते. या प्रसंगी व्यंकटेश मल्टीस्टेट च्या वतीने विभागीय अधिकारी प्रवीण यादव यांच्या हस्ते.यवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मा उज्वला रंधवे मॅडम तसेच पत्रकार अनिल गायकवाड यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेचे विभागीय अधिकारी प्रवीण यादव सर. यवत शाखा व्यवस्थापक मयूर कुंभार, कॅशियर वनिता कुंभार. सीनियर ऑफिसर अक्षय नवले. सीनियर ऑफिसर आकाश शिंगाडे जूनियर ऑफिसर शेखर फडतरे ऑफिस बॉय निखिल गायकवाड. व्यंकटेश मल्टीस्टेट चे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष