व्यंकटेश मल्टीस्टेट ,शाखा बोरिपर्धी ने दिले विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाचे धडे. नाथ नगर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली बँकिंग क्षेत्राची माहिती
By : Polticalface Team ,20-12-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.२० डिसेंबर २०२३. दौंड तालुक्यातील मौजे बोरिपार्धी ता दौंड जिल्हा पुणे. येथिल नाथनगर विद्यालयातील विद्यार्थी मुला मुलींना बँकेतील कामकाजा बाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. हा आगळा वेगळा उपक्रम बुधवार दि २० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:३०.वाजता बोरिपार्धी येथील व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेच्या शाखेत आयोजित करण्यात आला होता.
मौजे बोरिपार्धी ता दौंड जिल्हा पुणे येथील व्यंकटेश मल्टीस्टेटचे विभागीय अधिकारी मा प्रवीण यादव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरिपार्धी शाखेचे शाखा व्यवस्थापक मा.अंकुश परमाळे सर. यांनी व्यंकटेश मल्टीस्टेट च्या कामकाजा बाबत बोरिपार्धी येथील नाथनगर विद्यालयातील विद्यार्थी मुला मुलींना माहिती दिली.
ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींना शिक्षण घेत असताना त्यांना बँकेच्या व्यवहाराचे ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने बोरिपार्धी येथील व्यंकटेश मल्टीस्टेट चे शाखा व्यवस्थापक अंकुश परमाळे सर. यांनी नाथ नगर विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक व मुला मुलींना शाखेत भेट देण्याची विनंती केली होती. त्यानुसार नाथनगर विद्यालयातील शिक्षक मा सुनील सुपनवर सर व सहावी ते आठवी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थी मुला मुलींना घेऊन बोरिपार्धी येथील व्यंकटेश मल्टीस्टेट मध्ये भेट दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देत. बँकेतच बँक व्यवहाराचे धडे देण्यात आले.
या प्रसंगी शाखा व्यवस्थापक, कॅशियर यांचे काम कशा पद्धतीने केले जाते तसेच बँकेतील व्यवहाराचे ज्ञान देऊन बचत खाते उघडण्याचा फॉर्म कसा भरावा. रक्कम भरणा स्लिप कोणती असते. विड्रॉल स्लिप कोणती असते. चेक कसा भरावा. तसेच बँकेतील लॉकर ,तिजोरी प्रत्यक्ष दाखवून विद्यार्थी मुला मुलींना माहिती देण्यात आली.
बोरिपार्धी येथील व्यंकटेश मल्टीस्टेट बोरिपार्धी शाखेच्या व्यवस्थापकांनी हा उपक्रम सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात बँकिंग व्यवहारातील आर्थिक ज्ञान असणे काळाची गरज आहे. अशी प्रतिक्रिया डिव्हिजन मॅनेजर प्रवीण यादव सर यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले. या अभियानामुळे भारतातील युवा तरुण पिढी ही सुजाण व सुसंस्कृत व्हावी. लहानपणा पासूनच शालेय जीवनात असताना आर्थिक बचतीचे महत्व समजल्यास सुजाण नागरिक व पैशाचे महत्त्व समजणारी युवा तरुण पिढी निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
वाचक क्रमांक :