दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.२३ डिसेंबर २०२३ रोजी शेतकरी दिनाच्या निमित्ताने दौंड तालुक्यातील मौजे खोर ता दौंड जिल्हा पुणे. येथिल प्रगतीशील शेती उत्पादक शेतकऱ्यांचा संन्मान कार्यक्रम. दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी व्यंकटेश मल्टीस्टेट यवत शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी मौजे खोर पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक व प्रगतीशील बागायतदार शेतकरी. मारुती फरतडे. कमल फडतडे. भाऊसाहेब फडतडे. विष्णू बाजारे. सायली बाजारे. विशाल बाजारे. गणेश बाजारे. रामदास बाजारे. सोपान बाजारे. सुनिता बाजारे. शोभाताई डोंबे. अंकुश डोंबे. विशाल चौधरी. सुरेश काळे. गोरख फरतडे. रोहिदास डोंबे. विश्वनाथ फडतडे. उमेश डोंबे. रवी फडतडे. सचिन लोखंडे. या परिसरातील प्रगतीशील बागायतदार शेतकऱ्यांचा व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेचे ब्रँच मॅनेजर मयूर कुंभार यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
दौंड तालुक्यातील मौजे खोर पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकरी. या परीसरात मोठ्या प्रमाणात शेती असुन अन्न धान्य तसेच विविध प्रकारच्या फळांचे उत्पादन भरपूर प्रमाणात घेत असताना दिसुन येते. त्यामध्ये प्रामुख्याने अंजीर पंपई. कांदा. केळी. मका. गहु. ज्वारी. बाजरी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असताना दिसुन येते.
व्यंकटेश मल्टीस्टेट यवत शाखेच्या वतीने या परिसरात प्रथम असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच शेतकऱ्यांचा सन्मान केला हि बाब अतिशय लक्षणिय असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ नागरिक व उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या वेळी व्यंकटेश मल्टीस्टेट यवत शाखेतील कर्मचारी शेखर फरतडे. अक्षय नवले. आकाश शिंगाडे. तसेच परिसरातील शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :