राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान योजना. यवत पशुवैद्यकीय दवाखान्यात दूध उत्पादक शेतकरी मारतात चक्रा.
एक पशु सेवकावर ९ ते १० गावांचा भार...
By : Polticalface Team ,16-01-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड..
दौंड ता १५ जानेवारी २०२४ राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकतीच जाहीर केलेल्या दूध उत्पादकांसाठी ५ रुपये प्रतिलिटर अनुदान योजनेचा लाभ मिळण्या बाबत. दौंड तालुका ग्रामीण भागातील दूध उत्पादकांची धावपळ सुरू झाली आहे.
राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना. दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजना सुरू करण्यात आली असून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्याकरिता शासन निर्णयान्वे राज्यात स्वीकृत होणाऱ्या वेगवेगळ्या दुधाच्या गुण प्रतीतीत एकसूत्रता यावी. यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर दुधाची गुणप्रत निश्चित केली आहे.
(शासन निर्णय) दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी पुढील अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये इतके अनुदान असल्याचे नमूद करण्यात आले असून. सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या गुण प्रतिकरिता किमान २७ रुपये इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा होणार असल्याचे बंधनकारक राहील राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दुग्ध व्यवसाय यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर दूध अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी (EAR -TAG) महाराष्ट्र राज्यात INAPH /भारत पशुधन पोर्टलवर बंधनकारक राहील. शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्यांची पशुधनाची नोंदणी करण्यात यावी असे नमूद करण्यात आले
असल्याने. यवत ता दौंड जिल्हा पुणे. यवत पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकरी यवत पशुवैद्यकीय दवाखान्यात येलझरे घालु लागले आहेत. यवत येथील असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात काही दिवसांपासून पशुवैद्यकीय डॉक्टर रजेवर असल्याने खोर येथिल पशुवैद्यकीय डॉ.झगडे यांच्याकडे तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टर झगडे यांच्याकडे एकूण नऊ गावांचा भार असुन. दोन ते तीन गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरणाचे कामकाज पूर्ण होत आले आहे. दौंड पंचायत समिती कार्यालय पशुवैद्यकीय विभागांकडून उद्यापर्यंत नंबर बिल्ले उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यवत येथील सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना काही दिवसांपासून बंद आहे. पशु सेवक उपलब्ध नसल्याने यवत पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना तात्कळत वाट बघत बसण्याची वेळ आली आहे. या संदर्भात दौंड पंचायत समिती पशुवैद्यकीय विभागातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसात यवत परीसरातील लसीकरणाचे व नंबर बिल्ला ट्यागींचे कामकाज सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
वाचक क्रमांक :