श्री.गजानन नागरी सहकारी मर्यादित पतसंस्था शाखा यवत बोगस कर्ज वाटप बाबत. शिवाजी नांदखिले यांनी दौंड सहाय्यक निबंधकांकडे केली तक्रार
By : Polticalface Team ,17-01-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड..
दौंड ता १७ जानेवारी २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री गजानन नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेत बोगस कर्ज वाटप करून संस्थेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याची तक्रार. शिवाजी नारायण नांदखिले व संध्या शिवाजी नांदखिले यांनी दौंडचे सहाय्यक निबंधक हर्षीत तावरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की
सन २०११ मध्ये यवत येथील श्री गजानन नागरी सहकारी मर्यादित संस्थेच्या शाखेत शिवाजी नारायण नांदखिले (रा. बेटवाडी, गार, ता दौंड) यांच्या नावे बनावट सहीचा व कागदपत्रांचा वापर करून मुदत तारण कर्ज क्र.१०६४ प्रकरणात तीन लाख रुपये व संध्या शिवाजी नांदखिले (रा. बेटवाडी, गार, ता दौंड) यांच्या नावे बनावट सहीचा व कागदपत्रांचा वापर करून मुदत तारण कर्ज क्र.१०६३. तीन लाख रुपये बोगस कर्ज प्रकरण वाटप केले असल्याची तक्रार दौंडचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे. सदर दोन्ही कर्ज प्रकरणांमध्ये जामीनदारांच्या सह्या देखील बनावट असल्याचे तक्रार दारांनी सांगितले आहे. या दोन्ही कर्ज प्रकरणां बाबत पतसंस्थेने २०११ पासून ते २०२४ पर्यंत कर्ज वाटप केलेले संध्या नांदखिले व शिवाजी नांदखिले यांना गेली १३ वर्षामध्ये कसली ही वसुली ची नोटीस आज तागायत आली नसल्याचे या वेळी तक्रारदार यांनी सांगितले.
श्री गजानन नागरी संस्थेच्या बोगस कर्ज वाटपा संदर्भात श्री गजानन नागरी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन व यवत गावचे विद्यमान सरपंच समीर दोरगे यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलताना म्हणाले. शिवाजी नारायण नांदखिले व संध्या नारायण नांदखिले यांच्या कर्ज वाटपा बाबत सत्यता समोर आल्या शिवाय राहणार नाही. दौंड सहाय्यक वरिष्ठ अधिकारी यांनी तपासणी करून सदर प्रकार उघडकीस आणावा व संबंधितांनवर धडक कायदेशीर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया श्री गजानन नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन यांनी व्यक्त केली.)
श्री गजानन नागरी सहकारी मर्यादित पतसंस्था यवत शाखेतील चेअरमन सचिव व संचालक मंडळ या सर्वांनी संगणमत करून अशा प्रकारचे अनेक कर्ज प्रकरणे मंजूर केले आहेत. गहाणखत न करता लाखो रूपयांची कर्ज प्रकरणे मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. एकाच कुटुंबातील अनेक लोकांना बेकायदेशीर पणे कर्ज वाटप केले आहेत. श्री गजानन नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन सचिव व संचालक मंडळ यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच सदर श्री गजानन नागरी सहकारी संस्थेच्या कामकाजा बाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सखोल चौकशी करावी अशी तक्रारी अर्जदार यांनी मागणी केली आहे.
वाचक क्रमांक :