By : Polticalface Team ,05-02-2024
या बाबत सविस्तर माहिती अशी, दि.४ फेब्रुवारी रोजी दौंड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की गिरीम येथे नामे गुरूदास राऊत या इसमाने आपल्या जवळ धारदार तलवार बाळगून दौंड परिसरात दहशत निर्माण करत आहे, ही बातमी मिळताच दौंड पोलीस स्टेशन येथे नुकतेच नविन आलेले पोलीस निरीक्षक मा चंद्रशेखर यादव, यांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस अंमलदारांना घटनास्थळी पाठवून संबंधित इसमाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याजवळ असलेले धारदार तलवार ही ताब्यात घेतली आहे.
सदर इसमाला दौंड पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड ग्रामीण भागात व शहरात उघडपणे धारदार तलवार बाळगुण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे व दहशत माजवून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कृत्य करताना कोणी आढळून येताच तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन दौंड पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहे.पुढील तपास पोलिस हवालदार महेश भोसले हे करत आहेत.
वाचक क्रमांक :