By : Polticalface Team ,08-02-2024
रमाई भिमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंतीनिमित्त उरुळी कांचन ता हवेली जिल्हा पुणे, येथील तुपे वस्ती येथे कार्यक्रमात प्रमुख प्रवक्त्यांनी रमाई आंबेडकर यांचे बाल पण व वैवाहिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला, प्रमुख मान्यवरांनी बोलताना सांगितले, वनंद गावचे भिक्कु धोत्रे व रुक्मिणी धोत्रे, यांची मोठी मुलगी रमाईचा जन्म ०७ फेब्रुवारी १८९८ साली दाभोळ जवळील वनंद गावात झाला, आई रुक्मिणी संसारी व संस्कारी होती, रमाई वर तीचा फारच जीव होता, आठ वर्षाच्या रमाईला ती सांगत असे, रमा स्वच्छ राहावं, स्वच्छ मनाने जगावं, कष्ट करावं आणि आब्रुनी राहावं, आईचं हे बोलणं रामाच्या कायम लक्षात राहीलं काही दिवसातच रमाच्या माता पिताचे अल्पशा आजाराने निधन झाले, आई वडिलांचे छायाछत्र तिच्या पासून दुरावले, घाकटी बहिण गौरा, व घाकटा भाऊ शंकर आणि नऊ वर्षाच्या रमावर दुःखाचा डोंगर कोसळला, खऱ्या अर्थाने रमा व तिचे दोन भावंड माता पित्याविना पोरकी झाली, परिस्थिती च्या ओघात रमा अल्पवयातच प्रौढ विचाराची झाली होती, दुःख काय असतं हे तिला चांगलंच त्रास देऊन गेलं, या प्रसंगी रमाला व तिच्या भावंडांना वलंकर काकानी आणि गोविंदपुरकर मामाने या तीन भावंडांना मुंबई येथील भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला आणले, काकांची परिस्थिती जेमतेम बेताचीच होती, आई-वडिलांचे छत्र हरवलेली मुलं काकांकडे राहू लागली, या कालखंडात सुभेदार रामजी बाबा भिमरावासाठी मुलगी पाहत होते, भायखळ्याला मार्केट जवळ राहणाऱ्या लवंकरांकडे लग्नाची मुलगी आहे, असे रामजी बाबा याना समजले, मुलगी पाहताक्षणी रमा त्यांना पसंत पडली, गरीब घरातील व समजुतदार मुलगी भिमाला करावी असं त्यांना मनापासून वाटत होते, त्या वेळी भिमाचं वय १४ आणि रमाईचं वय ०९ होते, भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये अतिशय साध्या पद्धतीने रमाचं आणि भिमरावाचा लग्न सोहळा पार पडला, भिमराव आई विना पोरका होतो तर रमा आई वडिलांचे छत्र हरवलेली होती, खऱ्या अर्थाने रमाचे हसण्या खेळण्याचे वय होते, पण परिस्थितीने तिला प्रौढत्व आले होते, रमा विचारी व समजूतदार होती, आत्या मीराबाई भीमरावाच्या आवडी निवडी रमाला सांगत असे, भीमराव पुस्तक वेडा आहे, अभ्यासाच्या वेळी त्याला त्रास देऊ नये, असे मिराबाई रमाईला सांगत असे, त्यावेळी समाजातील एकमेव विद्यार्थी भीमराव प्रथम क्रमांकाने मॅट्रिक पास झाल्याने चौकडे आनंद व्यक्त केला जात होता, या प्रसंगी पत्नी रमाईचे काळीज सुपाएवढे झाले होते, पती भिमरावांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमांमध्ये रमाई भारावून गेली होती, कार्यक्रमाचे अध्यक्ष सी के बोले, आणि प्रवक्ते केळुसकर गुरुजी या मान्यवरांच्या मुखातून नवऱ्याचं कौतुक ऐकताना रमाई भारावून गेली होती, पती भीमरावांन बद्दल तीला मोठा अभिमान वाटत असे, भविष्यातील घटनाकार ज्ञानसूर्याची पत्नी आहे, हे रमाला तरी कुठे माहीत होते, कालांतराने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुढील शिक्षणासाठी परदेशात जावे लागले, त्या वेळी रमाईने अनेक संकटांना सामोरे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी माई रमाई ने घरातील महत्वाची जबाबदारी स्वीकारली होती, या विषयावर बोलताना प्रवचनकार पूर्व हवेली (संस्कार उपाध्यक्षा) सुकेशिनी घाटे यांच्या डोळ्यातुन अश्रू अनावर झाले होते, तर उपस्थित महिलांना ही हुंदके फुटत होते, प्रमुख प्रवक्त्यांनी रमाई भिमराव आंबेडकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला, या प्रसंगी उपस्थित अनुयायी व महिलांना गहिवरून आले होते.
जयंतीच्या निमित्ताने उरुळी कांचन तुपे वस्ती परिसरातील आलेल्या सर्व अनुयायांचे समता सैनिक दलाचे सैनिक सखाराम ओव्हाळ, भिमराव सैनिक, अशोक कांबळे, संतोष मोटे, विलास सांगळे, कैलास शिंदे, परमेश्वर कदम, यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती ताई लोंढे व जया ताई खापडे यांनी केले, या प्रसंगी रमाई महिला मंडळाच्या महिला उपासिका व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वाचक क्रमांक :