By : Polticalface Team ,14-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,१४ फेब्रुवारी २०२४ दौंड शहरातील मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना निर्भय करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळा-महाविद्यालयाच्या प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांची दौंडच्या पोलीस ठाण्यात बैठक घेऊन महिला मुलींच्या सुरक्षितते विषयी धडे दिले विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस निरीक्षकांनी घेतलेल्या भूमिकेचे उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वागत केले आहे,
शाळा-महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी मुली व महिलांना कुणी त्रास दिला तर तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन करताना त्यांनी सर्व शिक्षकांशी सविस्तर चर्चा करत अडचणी जाणून घेत सूचना केल्या.
शाळा-महाविद्यालय परिसरात ओळखी अनोळखी व्यक्तींकडून त्रास देणे,शाळेत येता जाता प्रवासात रोड रोमिंयोंकडून छेडछाड करणे, हातवारे व इशारे करून त्रास देणे, पाठलाग करणे, शाळा महाविद्यालय परिसरात थांबून टूकारकी करणे असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ दौंड पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे
तसेच अशा अडचणीच्या काळात गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी टुकारकी करून त्रास देणाऱ्यांचे फोटो व्हिडीओ काढून तात्काळ पोलिसांना पाठवावेत, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहावे, महाविद्यालयातील युवतींनी परिसरामध्ये व घरापासून महाविद्यालया पर्यंत जाताना येताना कुणी त्रास देत असेल तर न घाबरता समोर येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे, दौंड शहरातील शाळेमध्ये प्रत्येक महिन्याला पालक सभा घेऊन आप आपसात चर्चा करणे, विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे फायदे- तोटे या बाबत शाळेमध्ये मार्गदर्शन करणे आदि बाबत सूचना दिल्या विद्यार्थिनींना सुरक्षित व निर्भय ठेवण्यासाठी दौंड शहर पोलिस कार्यतत्पर आहोत, असा विश्वास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव त्यांनी बोलताना व्यक्त केला
या बैठकीसाठी संत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड, श्री योग विद्यालय बेटवाडी, स्वर्गीय सुभाष कूल माध्यमिक विद्यालय काळेवाडी, मातोश्री पार्वती बाई शाळा दौंड, आलेश्वर विद्यालय आलेगाव, पासलकर माध्यमिक विद्यालय नानविज, सिद्धेश्वर विद्यालय देऊळगाव राजे, जिजामाता विद्यालय गोपाळवाडी, कै.भाऊसाहेब भागवत विद्यालय माळेवाडी, जनता माध्यमिक विद्यालय दौंड, लर्न अँड स्कूल गोपाळवाडी, आश्रम शाळा मोरे वस्ती लिंगाळी, श्रीमती वि.च. विद्यालय दौंड, जिल्हा परिषद शाळा जाधववाडी, उस्मान अली हायस्कूल भिमनगर दौंड, अगरवाल स्कूल सिद्धार्थ नगर दौंड, शेजो विद्यालय दौंड, राजेश्वर विद्यालय राजेगाव, श्रीराम विद्यालय स्वामी चिंचोली, जिल्हा परिषद शाळा लोणारवाडी, ग्यारेला विद्यालय दौंड, भैरवनाथ विद्यालय दौंड, भैरवनाथ विद्यालय वायरलेस फाटा गिरिम अशा एकूण २३ शाळा-महाविद्यालयातील प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :