By : Polticalface Team ,14-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १४ फेब्रुवारी २०२४ दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी तालुका दौंड जिल्हा पुणे, येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आखाडे यांच्या समाज कार्याची दखल घेऊन, भारतीय जनता पार्टी दौंड तालुका वैद्यकीय आघाडी च्या अध्यक्षपदी मा चंद्रकांत नाथू आखाडे यांची निवड करण्यात आली.
दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल, यांच्या हस्ते चंद्रकांत आखाडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
या प्रसंगी दौंड तालुक्यातील व मौज कासुर्डी परिसरातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वांचीत वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष चंद्रकांत आखाडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष हरिचंद्र ठोंबरे, कासुर्डी ग्रामपंचायत सदस्य पिंटू शेठ आखाडे, कासुर्डी सोसायटीचे संचालक महेंद्र काका आखाडे, उद्योजक दिलीप गायकवाड, कासुर्डी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ठोंबरे, संतोष सर्जेराव आखाडे, संतोष आखाडे, प्रशांत चोरगे, मयूर सोळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे आमदार अँड राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे व कार्य जनसमुदायापर्यंत पोचवण्यासाठी तसेच पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी आपण कार्यरत राहावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे, दौंड तालुका व कासुर्डी पंचक्रोशीतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :