By : Polticalface Team ,14-02-2024
तसेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी विधी तज्ञ असीम सरोदे यांच्या समवेत सभास्थळी जात असताना अचानकपणे त्यांच्या गाडीवर हल्ला करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गळा घोटण्यासारखा लाजिरवाणा प्रकार असून या घटनेतील हल्लेखोरांना सीसीटीव्हीच्या व प्रसार माध्यमातून प्रसारित झालेल्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
या काही वर्षांमध्ये आमदार तसेच काही राजकीय नेत्यांच्यामार्फत गुंडाकरवी पत्रकारावर हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून शासनाने अशा घटना घडवणाऱ्याना योग्य शासन करावे, अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाकडून यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक पवार,कार्याध्यक्ष संजय सोनावणे,संघटक अनिल गायकवाड, सचिव राहुल अवचट,बाळासाहेब मुळीक, विठ्ठल थोरात,सुशांत जगताप,संदीप भालेराव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
वाचक क्रमांक :