By : Polticalface Team ,15-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता १५ फेब्रुवारी २०२४ दौंड तालुक्यातील अवैध धंद्या विरोधात दौंड पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले असून मुद्देमाल जप्त करत संबंधितांनवर धडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचा मनसुबा दौंड पोलिसांनी सुरू केला असल्याने. दौंड शहर व ग्रामीण भागातील अवैध धंदे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत,
तालुक्यातील तीन दारू अड्डयावर आणि दोन जुगार अड्डयावर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दौंड शहरातील गोवा गल्ली येथे तीन ठिकाणच्या दारू भट्टीवरून ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये कच्चे रसायन व तयार हात भट्टीची दारू चे रसायण असा मुद्देमालाचा समावेश असुन
कल्पना शामू जाधव, बबिता रामदास जाधव, शिला जेम्स गायकवाड (सर्व रा.गोवागल्ली दौंड) या तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरकुंभ येथे पुणे-सोलापूर हायवेच्या लगत असलेल्या सर्व्हिस रस्त्या लगत पत्रा शेडच्या आडोशास कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये आरोपीकडे मटक्याचे साहित्य जवळ बाळगून आपल्या ओळखीच्या लोकांना कल्याण-मटका जुगार खेळत व खेळवत असताना दौंड पोलिसांना सापडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर मटका जुगार आड्ड्याच्या ठिकाणी बाहेर आढळून आलेल्या दोन मोटार सायकली देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. लक्ष्मीकांत मनोहर लांडगे (रा.कुंभारगल्ली दौंड), राहुल विश्वनाथ कांबळे (रा.कुरकुंभ), अनिकेत अशोक चव्हाण
(रा.भीमनगर सिद्धेटेकरोड दौंड), विलास केरबा तांदळे (रा.जुनी ग्रामपंचायत कुरकुंभ), अक्षय उर्फ रामचंद्र आनपंदा कांबळे (रा.रावणगाव ता. दौंड) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीची नावे आहेत.
दौंड शहरात चालणाऱ्या जुगार अड्डयावरही कारवाई करून दौंड पोलिसांनी दोघांवर कायदेशीर कारवाई करत, मुंबई जुगार अॅक्ट कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश जाधव (रा.गोवा गल्ली दौंड), मनोज साळवी (रा.इंदिरानगर दौंड) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्या कडून १७६० रोकड, २५ हजार किमतीचा मोबाईल, एक पेन एक स्लिप बुक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स. पो.नी.तुकाराम राठोड, पोलिस अंमलदार पांडुरंग थोरात,किरण पांढरे, अमीर शेख, अमोल देवकाते, सुभाष राऊत, विशाल जावळे, निखिल जाधव, आदेश राऊत, रवी काळे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण पो हवा असिफ शेख आदींनी केली आहे.
वाचक क्रमांक :