By : Polticalface Team ,23-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड शहरात दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत कामगार वाहतूक करणाऱ्या बसेस ना सरपंच वस्ती रोडवर बंदी_
दौंड ता.२३ फेब्रुवारी २०२४. दौंड शहरातील अतिक्रमणांवर दौंड पोलिसांनी कारवाई करण्याचे सत्र सुरु केले आहे. आता दौंड शहरामधील सरपंच वस्ती येथे गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी चौका चौकात कित्येक वर्षां पासून करण्यात आलेल्या अतिक्रमणावर दौंड पोलिसांनी कारवाई करत दौंडकरांना दिलासा दिला आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हाती घेतलेल्या या कारवाईचे दौंड शहरात सर्वत्र स्वागत होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता, या अनुषंगाने अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली असल्याने नागरिकांचा श्वास मोकळा झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने संविधान चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील रस्त्या लगतची अतिक्रमणे काढली होती. सरपंच वस्ती गोपळवाडी रोडवर वर्षानुवर्षे फळविक्रेते भाजीपाला विक्रेते, मच्छी विक्रेते, तसेच चायनीज गाडे व इतर अनेक प्रकारच्या दुकानदारांनी रस्त्यावरच अतिक्रमण केले असल्याने
रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होत होती. सर्व सामान्य नागरिक व वाहन चालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या बेकायदेशीर अतिक्रम संदर्भात दौंड पोलिसांनी महत्वपूर्ण निर्णय घेऊन अतिक्रमाणावर हातोडा मारला आहे. तसेच कुरकुंभ एमआयडीसी वरून सरपंच वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर बसेस कामगारांना घेऊन येत असतात. बस आल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. सरपंच वस्ती रस्त्याने मोठ्या ६० ते ७० बसेस प्रतिदिनी वाहतूक करत असतात त्यामुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात ३ ते ४ तास वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असल्याने
सर्व बस वाहनांना प्रायोगिक तत्त्वावर दुपारी ३ ते रात्री ९ वाजे पर्यंत वाहतूक करण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव त्यांनी सांगितले,
सरपंच वस्ती येथील रस्ते खुले झाल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. कित्येक वर्षा नंतर सार्वजनिक रस्ते मोकळे झाल्याने दौंड शहरातील नागरिकांनकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया, दुरंदे तसेच सहाय्यक फौजदार सुरेश चौधरी, बबन जाधव, पो.ह.पांडुरंग थोरात, पो.ना. नितीन चव्हाण ,विशाल जावळे, पो.कॉ. योगेश पाटील, अक्षय घोडके, इंद्रजीत वाळुंज, आमिर शेख आदींनी केली आहे. तसेच मोठे व्यावसायिक यांनी व्यवसाय करावा परंतु सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप होऊ नये या बाबत संबंधित व्यावसायिकांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केली.
वाचक क्रमांक :