यवत येथील माणकोबा वाडी जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
By : Polticalface Team ,27-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २७ फेब्रुवारी २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत मानकोबावाडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मुला मुलींचे आरोग्य तपासणी उपक्रम. तसेच फ्लिटगार्ड फिल्टर्स व विश्वराज हाॕस्पिटल लोणी काळभोर यांचा उपक्रम. यवत ता दौंड जिल्हा पुणे. माणकोबावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विध्यार्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये तज्ञ डाॕक्टरांच्या उपस्थितीत विध्यार्थ्यांची रक्तातील साखरेचे प्रमाण , रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण तसेच डोळे , कान , नाक ,घसा यांची तपासणी करण्यात आली . तसेच विध्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले .आरोग्य शिबिराचे उद्घाटन फ्लिटगार्ड फिल्टर्स कंपनीच्या प्रियंका चव्हाण मॕडम यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी विश्वराज हाॕस्पिटल लोणी काळभोर च्या बालरोग तज्ञ डॉ.धिरजा मॕडम यांनी विध्यार्थ्यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले तसेच बाल वयातील मधुमेह व लठ्ठपणा कसा टाळावा या विषयी अधिक माहीती दिली. यवत केंद्राचे केंद्र प्रमुख प्रणय कुमार पवार. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मनोहर खताळ , ग्रामपंचायत सदस्य सौ.नंदा बिचकुले , सामाजिक कार्यकर्ते मल्हारी बिचकुले धुळाजी (नाना) भिसे. शिक्षणप्रेमी मारुती बिचकुले शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय बिचकुले मंगल खताळ. तसेच निकिता पिंगळे , आशा खताळ. जिजाबाई बिचकुले. संपत भिसे. तात्या भिसे. सोमनाथ खुपसे शिलाबाई कर्हे. महादेव क-हे. राहुल बिचकुले सुभाष बिचकुले. मुख्याध्यापिका स्वाती माने. शिक्षक विक्रम लांडगे. संदिप साळवे उपस्थित होते. फ्लिटगार्ड फिल्टर्स कंपनी करत असलेल्या या सामाजिक कार्याबद्दल यवत ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
वाचक क्रमांक :