दौंड तालुक्यातील मौजे वासुंदे येथे. प्रवीण मळेकर खून प्रकरणातील आरोपी दौंड पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

By : Polticalface Team ,03-03-2024

दौंड तालुक्यातील मौजे वासुंदे येथे. प्रवीण मळेकर खून प्रकरणातील आरोपी दौंड पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड: दौंड ता ०३ मार्च २०२४ दौंड तालुक्यातील मौजे वासुंदे ता दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत प्रवीण मळेकर खून प्रकरणातील अज्ञात आरोपी. दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या सखोल तपासात अखेर गुन्ह्यातील आरोपी. दिपक रामदास लोंढे वय ३७ वर्ष रा वासुंदे तालुका दौंड जिल्हा पुणे. यास ताब्यात घेऊन मोठी कामगिरी बजावली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. 


रस्त्याने जाणाऱ्या वाहणांमुळे मला त्रास होतो. जाणून-बुजून माझ्या अंगावर वाहने घालतात...असे सांगणाऱ्या एका आरोपीने त्रास होतोय या कारणावरून रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वारा सोबत वाद घालून हातातील धारदार सुरा मारला. या घटनेत त्याचा जीव गेला आहे. घटनेचा शोध लावुन दौंड पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून जेरबंद केले आहे.


या बाबत सविस्तर माहिती अशी, मयत प्रवीण मळेकर (वय-५८) हे लोन रिकव्हरी एजन्सीत काम करत होते. ते दि.१ मार्च रोजी रात्री आपल्या मोटार सायकल वरून बारामतीहुन कुरकुंभ येथे जात असताना दौंड तालुक्यातील वासुंदे हद्दीत एका अज्ञाताने धारदार हत्याराने भोकसून त्यांचा खून केल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने फिर्याद त्यांचा मुलगा ऋषिकेश मळेकर यांनी दौंड पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.  या घटनेची गंभीर दखल घेऊन दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव धटनास्थळी भेट दिली होती. तसेच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या.


खून प्रकरणातील घटनेचा सखोल तपास करताना पोलिसांनी त्या रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी केली, अनेकांशी विचारपूस केली. सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यावेळी तपासात त्या परिसरातच राहणाऱ्या एका इसमाकडून वारंवार वाहनांवर दगडफेक तसेच हुज्जत घालण्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. घटनेचा सूक्ष्म तपास करताना पोलिसांनी डॉग स्कॉड बोलावून आरोपीचा माग काढला. या अगोदर ही दगड मारणे, शिवीगाळ करणे असे प्रकार आरोपी करत होता. काही तासांपूर्वीही आरोपीने गाडीवर दगड मारले होते. मागील एका गुन्ह्यात महिलेला आरोपीने धारदार हत्याराचा धमकी साठी वापर केला असल्या बाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.   


आरोपी दिपक रामदास लोंढे वय-३७ वर्षे (रा.वासुंदे ता. दौंड) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, अरविंद गटकुळ तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, सागर म्हेत्रे, नितीन बोराडे, रवी काळे, अमीर शेख, संजय नगरे, अमोल देवकाते, शरद वारे, योगेश गोलांडे, महेश भोसले, किरण पांढरे, पोलीस जवान असिफ शेख, मंगेश ठिगळे, विजय कांचन, धिरज जाधव आदींनी केली आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष