पुणे महानगरपालिकेने खडकवासला प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आरक्षित केल्यामुळे. जनाई शिरसाई योजनेला पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. आमदार राहुल कुल.
By : Polticalface Team ,06-03-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता.०६ मार्च २०२४ पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेत जमिनीला पाणी पुरविण्यासाठी जलसंपदा विभागा मार्फत जनाई - शिरसाई उपसा सिंचन योजना राबविण्यात आली,
पुणे महानगर पालिकेने खडकवासला प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आरक्षित केल्यामुळे जनाई-शिरसाई योजनेला पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. व लाभ धारक शेतकऱ्यांना योजनेसाठी मंजूर असलेल्या 3.6. टि एम सी पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही.
या अनुषंगाने प्रकल्पांतर्गत कालव्यांच्या माध्यमातून पाण्याचे वितरण करण्या ऐवजी बंदनलिका वितरण प्रणाली (पाईपलाईन) राबवून पाण्याचा वहनव्यय कमी होऊन योग्य दाबाने शेतीसाठी पाणी मिळू शकेल यासाठी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना बंदनलिका वितरण प्रणाली (पाईपलाईन) द्वारे राबविण्या बाबत प्रस्ताव जलसंपदा विभागा मार्फत SLTAC येथे सादर करण्यात आला आहे.
सदर प्रस्तावाचा आराखडा व त्यामध्ये कोण कोणत्या बाबी समाविष्ट आहेत याची माहिती लाभ धारक शेतकऱ्यांना मिळावी त्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी कार्यकारी अभियंता श्री.श्रीकृष्ण गुंजाळ. उपअभियंता जनाई – शिरसाई श्री.एस.एस.साळुंके, भाजपा तालुका अध्यक्ष श्री.हरिभाऊ ठोंबरे, किसान मोर्चा अध्यक्ष श्री.अरुण आटोळे. तसेच जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे लाभ धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संबंधित लाभ धारकांच्या मागणी व सूचना विचारात घेऊन. सदर प्रस्ताव तयार करून पुढील मान्यतेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन कुल यांनी दिले.
वाचक क्रमांक :